पिसादेवीकरांना महिनाभरात जायकवाडीचे पाणी

प्रकाश बनकर
शनिवार, 21 डिसेंबर 2019

पाच सप्टेंबर 2018 रोजी पिसादेवीसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन झाले. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना अंतिम टप्प्यात आली आहे. सप्टेंबर 2019 मध्ये तीन किलोमीटर पाणीपुरवठ्याच्या लाइनचे टेस्टिंग करण्यात आले. याच महिन्यात जलपूजनाचे काम करण्यात आले.

औरंगाबाद: वर्षानुवर्षे टॅंकरवर जगणाऱ्या पिसादेवीकरांना हक्‍काचे जायकवाडीचे पाणी मिळण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जलस्वराज योजनेच्या माध्यमातून हे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असून आठवड्याभरात नळ जोडणीचे काम होणार आहे. तर महिनाभरात पिसादेवीकरांना जायकवाडीचे पाणी मिळणार आहे, अशी माहिती उपसरपंच भाऊसाहेब काळे यांनी दिली. 

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

500 नागरिकांनी नळ कनेक्‍शनासाठी अर्ज
पाच सप्टेंबर 2018 रोजी पिसादेवीसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन झाले. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना अंतिम टप्प्यात आली आहे. सप्टेंबर 2019 मध्ये तीन किलोमीटर पाणीपुरवठ्याच्या लाइनचे टेस्टिंग करण्यात आले. याच महिन्यात जलपूजनाचे काम करण्यात आले. गावातील 500 नागरिकांनी नळ कनेक्‍शनासाठी अर्ज आणि त्यांची फीसही भरली आहे. यामुळे आठवड्याभरात नळ जोडणीला सुरवात होईल आणि महिनाभरात गावकऱ्यांना पाणी मिळणार आहे. अभियंता चांदेकर यांनीही पाणीपुरवठा योजनेसाठी पुढाकार घेतला असल्याचेही श्री. काळे यांनी सांगितले. 

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले !

टाकीचे काम अंतिम टप्प्यात 
जलस्वराज योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजनेसाठी गावात पाच लाख लिटर पाण्याच्या टाकीचे काम करण्यात येत आहे. जलपूजन झाले त्याच दिवशी या टाकीच्या कामास सुरवात झाली आहे. या पाण्याच्या टाकीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. याच माध्यमातून गावकऱ्यांना पाणी मिळणार आहे. 

गावाला अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्‍न होता. टॅंकर सुरू करूनही ते पाणी पुरत नव्हेत. आता जलस्वराज योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजनामुळे पाणीप्रश्‍न सुटला आहे. मीही एक महिला आहे. महिलांचा प्रमुख प्रश्‍न सोडवता आला, याचा आनंद आहे. 
-मनीषा अजिनाथ धामणे, सरपंच, पिसादेवी. 

 

 

जलस्वराज योजनेमुळे मोठा त्रास दूर झाला. पाणी आल्यामुळे आता या भागात विकासही झपाट्याने होऊ लागला आहे. नवीन घर घेणाऱ्यांचाही कल पिसादेवीकडे येऊ लागला आहे. 
- भाऊसाहेब काळे, उपसरपंच, पिसादेवी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaikwadi Water During The Month for Citizen of Pisadevi