नांदेड : ‘कोरोना’रुपी वैश्विक संकटाचा सामना करताना हॉस्पीटीलिटीमध्ये अग्रेसर असलेले देश हतबल झाले आहेत. भारत देशात ‘कोरोना’चा शिरकाव झाल्यापासून ‘कोरोना’रुपी राक्षसास रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यात उद्योजक, व्यवसायिक, स्वंयसेवी संस्था, संघटना शिवाय काही दानशूर नागरिकही जमेल त्या परीने केंद्र व राज्य सरकारला मदतीचा हात देत आहेत.
तालुका आणि जिल्हा पातळीवर देखील अन्नधान्याचे वाटप असो की, गरजवंतांना जेवणाची व्यवस्था असो त्यासाठी समाजातील प्रत्येक घटक आपापल्या परीने वाटा उचलत आहेत. यात जैन समाज संघटना देखील मागे नाही. संघटनेतील काही दानशुर व्यक्तींनी एकत्र येत नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयास अत्यावश्य सुविधेची गरज पूर्ण करण्याच्या हेतुने चक्क दोन व्हेंटीलेटर देऊन मदत केली आहे.
हेही वाचा- Video-लॉकडाउन : गरजू मुलींच्या आयुष्यात पेरला आशेचा किरण, कुणी? ते वाचाच
दानशुरांच्या पुढाकारातुन व्हेंटीलेटर भेट
‘कोरोना’चा वाढता प्रदुर्भाव, संभाव्य रुग्णांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील व्हेंटिलेटरची असलेली कमतरता लक्षात घेता जैन समाज संघटनेतील काही दानशुर मंडळी पुढे आली. त्यांनी शासकीय रुग्णालयास दोन बेसिक व्हेंटिलेटर उपलब्ध करुन शुक्रवारी (ता.२४ एप्रिल २०२०) जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे सुपुर्द केले आहे.
हेही वाचा- शीख भाविकांचा जत्था पंजाबकडे रवाना
रुग्णालयास कायमस्वरूपी झाली मदत
जैन समाज संघटनेचे महेंद्र (मुन्ना )जैन, आनंद जैन, दीपक कोठारी, ऋषिकेश कोंडेकर, राहुल गांधी यांनी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्याकडे हे दोन व्हेंटीलेटर सोपवले. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांची उपस्थिती होती. सगळीकडे अन्नदानछत्र व अन्नधान्याची किट वाटप होत असताना रुग्णालयासाठी कायमस्वरूपी काहीतरी मदत करावी अशी संकल्पना दीपक कोठारी यांनी मांडली.
यांचे प्रयत्न आले फळाला
त्यानंतर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली मुन्ना (महेंद्र) जैन, आनंद जैन यांची टीम कामाला लागली. व्हेंटिलेटरची ऑर्डर दिली व केवळ पाच दिवसात संकल्पना प्रत्यक्षात उतरली. विशेष म्हणजे ज्या दानशूर व्यक्तींनी या कामी मदत केली, त्यांनी आपले नाव कुठेही न घेण्याची विनंती केली. दरम्यान आकाश महेंद्र जैन यांच्यातर्फे मुख्यमंत्री साह्यता निधीस अकरा हजार रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे दिला.
|