Jal Jeevan Mission : योजनेला वसमत तालुक्यात लागली गळती; विहिरीचा ठराव एका गट क्रमांकाचा अन् खोदली ईतर गटात

भ्रष्टाचाराचा कळस म्हणून तालुक्यातील कागबन येथे तर ठराव एका गट क्रमांकाचा आणि
jal jivan
jal jivansakal

वसमत - प्रत्येक गावात , प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहचावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या जल जीवन मिशनच्या कामाला वसमत तालुक्यात गळती लागली आहे. कोट्यावदीच्या या योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत.वसमत तालुक्यात जल जीवन मिशन योजनेचे जवळपास ३०० कोटींचे कामे सुरु आहेत. योजनेचे काम हाती घेतलेल्या पन्नास टक्क्याच्या वर गावातून प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत.

भ्रष्टाचाराचा कळस म्हणून तालुक्यातील कागबन येथे तर ठराव एका गट क्रमांकाचा आणि विहिर ईतर गटक्रमांकात खोदून लाखो रुपये उखळयाचा प्रकार समोर आला आहे. कागबन येथे जल जीवन मिशन योजनेच्या विहिरीसाठी गट क्रमांक १ मध्ये घेण्याचा ठराव ग्रामपंचायतने पारीत केला. तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवण्यात आला होता. परंतू प्रत्यक्षात ग्रामपंचायतीचा ठराव नसलेल्या व सातबारावर नोंद नसलेल्या गट क्रमांक ६८ मध्ये विहिर खोदकाम करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे बेकायदेशीर विहिरीच्या कामापोटी २० लाख ६२ हजार रुपये उचलण्यात आले आहेत. विशेष म्हणजे विहिरीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या गावालगत जमिनी असताना गावापासून १ किलोमिटर दूध अंतरावर विहीर केल्याने तसेच जागेची राजिष्ट्री व दानपत्र नाही, सातबारावर नोंद नाही. असे असताना ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कनिष्ठ अभियंता, उपविभागीय अभियंता यांच्या साक्षीने बेकायदेशीर लाखोंचे बिलही उचलले आहे.

याबाबत सुदाम भालेराव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून बेकायदेशीर झालेली विहीर रद्द करुन या कामापोटी उचललेले २० लाख ६२ हजार रुपये शासनाकडे जमा करावे तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

jal jivan
Jal Jeevan Mission: जलजीवन मिशनच्या कामांची 13 दिवसांत द्यावी लागणार देयके

या योजनेचे काम एका खाजगी कंपणीकडून सुरु आहे. सदरील कामाच्या देखभालीत आमच्याकडुन दिरंगाई झाली असून गट क्रमांक ६८ चा ठराव घेण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतू आम्हाला ग्रामसेवक भेटत नाही.-नितिन कोकडवार, (कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, वसमत.)

jal jivan
Jal Jeevan Mission : ग्रा. पं. कडील थकबाकीने जलजीवन योजना अडचणीत; योजनांच्या जलचाचण्या रखडल्या

कागबन येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बेकायदेशीर झालेली विहीर रद्द करावी. तसेच या कामापोटी उचललेली रक्कम शासनाकडे जमा करावी आणि सदरील प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा हिंगोली येथे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.-सुदाम भालेराव, (तक्रारदार, टाकळगाव ता.वसमत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com