जळगाव महामार्गासंदर्भात ‘सुमोटो’ याचिका दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. परिणामी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी बुधवारी सुमोटो याचिका दाखल करून घेतली. प्रकरणाची पुढील सुनावणी एक आठवड्यानंतर होणार आहे.

औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. परिणामी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी बुधवारी सुमोटो याचिका दाखल करून घेतली. प्रकरणाची पुढील सुनावणी एक आठवड्यानंतर होणार आहे.

चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी एकेरी वाहतुकीमुळे कोंडी होऊन पाच-पाच तास प्रवाशांचा खोळंबा होत आहे. धुळीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहेच; पण धडधडीमुळे वाहनांचे सस्पेन्शन खराब झाल्याच्याही तक्रारी लोकांनी केल्या आहेत. त्यामुळे देश-परदेशातील बहुतांश पर्यटक अजिंठ्याला जाण्याचे टाळत आहेत, यावर ‘सकाळ’ने आपल्या बातमीतून प्रकाश टाकला. या बातमीची दखल घेत खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली. शिवाय प्रकरणात ‘अमायकस क्‍युरी‘ (न्यायालयाचे मित्र) म्हणून ॲड. चैतन्य धारूरकर यांची नियुक्ती केली असून, त्यांना आठवड्यात मसुदा तयार करण्याचे निर्देश दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalgaon Highway Sumoto Petition Court