
जळकोट बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस यांचे बहुमत येऊन सत्ता हाती घेतली होती. बाजार समितीच्या सभापती पदी मन्मथ किडे तर उपसभापती पदी बाळासाहेब दळवे पाटील यांची निवड करण्यात आली होती.
जळकोट (लातूर) : येथील बाजार समितीची मुदत जुलै सन २०२० रोजी संपली होती. परंतु कोरोनामुळे सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली होती. अचानक बाजार समिती बरखास्त करुन अखेर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासकपदी जळकोट उपनिबंधक अमोल वाघमारे यांनी (ता.१५) डिंसेबर रोजी पदभार स्वीकारला आहे.
हे ही वाचा : जालना : तीन दरोडेखोर गजाआड, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
जळकोट बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस यांचे बहुमत येऊन सत्ता हाती घेतली होती. बाजार समितीच्या सभापती पदी मन्मथ किडे तर उपसभापती पदी बाळासाहेब दळवे पाटील यांची निवड करण्यात आली होती. पाच वर्षाच्या काळात बाजार समितीकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या होत्या. पाच वर्ष आपला पूर्ण कार्यकाल पूर्ण केले होते.
दरम्यान, मुदत संपल्यानंतरही सहा महिन्याचा कालावधी वाढवण्यात आला होता. महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे बाजार समितीवर निवडणूक होईपर्यत कार्यकर्त्याची वर्णी लागेल, अशी आशा दिसून येत होती. परंतु (ता.१५) डिंसेबर रोजी अचानक समितीवर प्रशासकांची नेमणूक झाल्याने कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसून येत होती. जळकोट बाजार समितीच्या सभापती मन्मथ किडे, उपसभापती बाळासाहेब दळवे तर संचालक पदी बालाजी बारमाळे, मंगेश हुंडेकर, बाबुराव जाधव, संतोष तिडके, धोडीराम पाटील, विठ्ठल चंदावार, विरेद्र केंद्रे, वंसत येनालडे, उमाकांत सोनकांबळे, विलास गबाळे, मल्लिकार्जुन मरतुळे, बिस्मिला बेग आदींचा समावेश होता.
हे ही वाचा : अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी मराठवाड्यात येणार केंद्रीय पथक
तालुक्यात शेतकऱ्यांनी काॅग्रेस, राष्टवादी काँग्रेसला बहुमत देऊन आमचा विश्वास टाकल. पाच वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. बाजार समितीच्या आवारात सिमेंट रस्ता, व्यापाऱ्यासाठी गाळे, विद्युतीकरण आदी कामे करण्यात आले. बाजार समिती शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी व्यापाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन भाव चांगला देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी शेतीमाल तारण योजना राबविण्यात आली. पाच वर्षात शेतकरी व व्यापाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली.
- मन्मथ किडे, सभापती बाजार समिती, जळकोट
संपादन - सुस्मिता वडतिले