
कोळनूर परिसरात सतत शेतकऱ्यांना नापिकी व दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत होते.
जळकोट (जि.लातूर): कोळनुर (ता. जळकोट) येथील अल्पभूधारक शेतकरी गोविंद बापूना चोले यांनी आत्महत्या केली आहे. वयाच्या 70 व्या वर्षी चोले यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपवली आहे.
कोळनूर परिसरात सतत शेतकऱ्यांना नापिकी व दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत होते. या परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने हातात आलेले पीक दुष्काळामुळे हिरावून घेतले जाते. मागील वर्षी कोरडा दुष्काळ तर या वर्षी अतीवृष्टी झाली. त्यामुळे हातात आलेले पिक गेले शेतकऱ्यांचा संसाराचा गाडा चालवणे अवघड झालं आहे.
मराठवाड्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी रिमझिम पाऊस, पिकांना फटका
उत्पन्नाचे दुसरे कुठलेच साधन नसल्याने चोले यांनी स्वतःच्या शेतात तन नाशक औषध प्राशन केले. ही गोष्ट मुलगा विष्णू गोविंद चोले याच्या लक्षात येताच त्यांनी उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन ,नातू असा परिवार आहे.