कोरोनामुळे शंभर वर्षाची परंपरा खंडीत ; जळकोटची दत्त जयंती यात्रा रद्द

शिवशंकर काळे
Saturday, 26 December 2020

जळकोट शहरातील मार्केट परिसरात सव्वादोन वर्षापूर्वी दत्त मंदीरचा स्थापना शहरातील उद्योजक कै.दिंगबर गबाळे यांनी सुरु केली होती. तीच परंपरा त्याचा मुलगा अवधूत गबाळे यांनी सुरु ठेवली आहे.

जळकोट (लातूर) : शहरातील दत्त मंदिर याञा गेल्या १०० वर्षापासून चालत आलेली होती. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने १०० वर्षाची परंपरा खंडित झाली आहे.

हे ही वाचा : गुंजोटीत माजी सैनिक आघाडी करण्याच्या तयारीत ! महाविकास आघाडीचे गणित जुळण्यासाठी करावी लागेल कसरत

जळकोट शहरातील मार्केट परिसरात सव्वादोन वर्षापूर्वी दत्त मंदीरचा स्थापना शहरातील उद्योजक कै.दिंगबर गबाळे यांनी सुरु केली होती. तीच परंपरा त्याचा मुलगा अवधूत गबाळे यांनी सुरु ठेवली आहे. यावर्षी (ता.१२) रोजी पासून दत्त मंदिर याञेला प्रारंभ झाला आहे. याञेस निजामाबाद, नांदेड, लातूर, आध्रा, कनार्टक भागातील हजारो भाविक दरवर्षी येत होते. विविध नाटके, आगाशीपाळणे, खेळणी, प्रसाद दुकानाने मंदिर परिसर खच्चा भरतो. आठ दिवस याञेनिमीत्त आठ दिवस विविध कार्यक्रमाचे समितीकडून आयोजन केले जाते.
 
हे ही वाचा : कडबा कुट्टी यंत्रात हात गेल्याने युवकाचे तुटली बोटे ; थेरगाव येथील घटना 

दरम्यान, यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाकडून परवानगी दिली नसल्याने नेहमी प्रमाणे दत्ताची समितीकडून पूजा अर्चा केली जात आहे. दरवर्षी या महिन्यात जळकोट शहरात आठ दिवस जञेचे स्वरूप दिसत असते. परंतु यावर्षी माञ जळकोट शहरात शुकशुकाट दिसून येत असून व्यापारी, छोटो मोठे उद्योगारांची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

हे ही वाचा : समोरा-समोर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी

दरवर्षी जञेमुळे अनेक लोकांना छोट्या मोठ्या धंद्यातून हजारो रुपये फायदा होत होता. परंतु कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार याञेचे साध्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील भाविक दर्शनासाठी येत असले तरी प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे नियमात राहून भाविकाला दर्शन दिले जात आहे.
- अवदुत गबाळे, अध्यक्ष, दत्त मंदिर समिती जळकोट.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalkots Datta Jayanti Yatra has been canceled this year due to corona