

- बाबासाहेब गोंटे
अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरात एका इमारतीचं खोदकाम सुरु असताना त्याखाली एक पुरातन मंदिराचं बांधकाम आढळून आलं आहे. हे मंदिर नेमकं कशाचं आहे, किती काळापूर्वीच आहे? असे प्रश्न प्रश्न उपस्थित झाले असून यामुळं लोकांची उत्सुकता ताणली गेली आहे. पण या मंदिराचा संबंध पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्याशी असल्याचं बोललं जात असल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.