Jalna : पशू-पक्ष्यांसाठी आता ॲम्ब्युलन्स ; जालन्यात समस्त महाजन ट्रस्टचा पुढाकार

पांजरपोळ गोशाळेत झालेल्या ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळ्यास समस्त महाजन ट्रस्टच्या
Animals Ambulance
Animals Ambulance sakal

जालना : जखमी पशू-पक्ष्यांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी जालन्यात समस्त महाजन ट्रस्टच्या पुढाकाराने अद्ययावत अशा ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.१४) पांजरपोळ गोशाळेत या ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. शहरात कुठेही जखमी अवस्थेत पशू, प्राणी अथवा पक्षी आढळून आल्यास नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आवाहन पांजरपोळ ट्रस्टचे अध्यक्ष उद्योजक घनश्याम गोयल यांनी केले आहे.

पांजरपोळ गोशाळेत झालेल्या ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळ्यास समस्त महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई, उद्योजक सुनील रायठठ्ठा, शिवरतन मुंदडा, विजय कामड, महेंद्र भक्कड, कैलासचंद्र बियाणी, पुसाराम मुंदडा, डॉ. रामलाल बेनिवाल, गोपाल गोमतीवाले, अन्नामृत फाउंडेशनचे गणेश नखाते, रोहित नलावडे आदींची उपस्थिती होती.

उद्योजक श्री. गोयल म्हणाले, की समस्त महाजन ट्रस्टने भूतदयेची सेवा करण्यासाठी उचललेले पाऊल जीवनदायी आहे. पशुचिकित्सक, औषधांसह सुसज्ज ॲम्ब्युलन्समुळे शहरातील जखमी पशू- पक्ष्यांना जीवदान मिळेल. पांजरपोळ गोशाळेचे या उपक्रमास सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, समस्त महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई यांनी ट्रस्टतर्फे मुंबईत ११ ॲम्ब्युलन्स कार्यान्वित असून जखमी अवस्थेत आढळून आलेले मांजर, पोपट, कबुतर, कुत्रे अशा एक हजार ५२० प्राण्यांवर उपचार करण्यात आले आहेत. शहरात कुठे ही पशू, पक्षी जखमी अवस्थेत आढळून आल्यास (९१५२९९५३९९) हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com