कोरोनाचे रुग्ण वाढले! फिरण्यावर आली बंदी, जिल्ह्यात पुन्हा कलम 144 लागू

corona updates
corona updates

जालना: राज्यात अनलाॅक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नागरिकांसह प्रशासनाला कोरोनाचा विसर पडल्याने कोरोना प्रतिबंधक नियमांकडे सर्वांनी दूर्लक्ष केले. परिणामी कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागल्याने प्रशासनाला पुन्हा जाग आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जालना पोलिस अधीक्षकांनी पुढील एक महिन्या करीता जिल्ह्यात कलम 144 लगू केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाने लाॅकडाऊन सारखा कठोर निर्णय घेतला होता. कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून टप्प्या-टप्प्या अनलाॅक प्रक्रिया सुरू केली. मात्र, कोरोना हद्दपार झाल्याप्रमाणे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास सुरवात केली आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांच्या संख्येत प्रत्येक दिवसाला वाढ होत आहे.

तर दुसरीकडे फिजिकल डिस्टेंसिंगचा निमय जिल्ह्यातून कधीच हद्दपार झाला आहे. तसेच मार्केटमधील विविध दुकान, एटीएम सेंटर, निमशासकीय कार्यालयांसह शासकीय कार्यालयातील सॅनिटायझरही गायब झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने ही या सर्व बाबींकडे दूर्लक्ष केले. त्यात मध्यंतरी जिल्ह्यात मोर्चे, ठिय्या आंदोलने, निदर्शने आदी आंदोलनास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. तर दुसरीकडे लग्न, धार्मिक कार्याक्रमांना उपस्थितीत लोकांच्या नियमांकडे जिल्हा प्रशासनाकडून दूर्लक्ष करण्यात आले. परिणामी जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत.

कोरोना रूग्ण संख्येत  वाढ होत असतांना पुन्हा जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी जिल्ह्यात पुढील एक महिन्यापर्यंत कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात या पुढे मोर्चा, निदर्शने, उपोषण आदी आंदोलने करण्यास परवाना दिला जाणार नाही. तसेच  शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तींना निवेदन देण्यासाठी एकत्र येण्यास ही मनाई करण्यात आली आहे.  त्यामुळे आता तरी जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दीवर नियंत्रण आणून फिजिकल डिस्टेंसिंगच्या निमयांचे पालनासह विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून नियमाची अंमलबजावणी करून कोरोनाचा प्रसार नित्रणांत आणला जाईल हिच अपेक्षा.

(edited by- pramod sarawale)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com