

57 Day Justice in Jalna Child Abuse Case Accused Gets Life Term
esakal
-उमेश वाघमारे
जालना: जालना शहराला हादरवून सोडणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाचा अवघ्या ५७ दिवसांत निकाल लागला आहे. विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने या गंभीर गुन्ह्याची जलदगतीने सुनावणी पूर्ण करत आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.