CORONAVIRUS : जालन्यात कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, एकूण मृत्यू संख्या ३५ वर

महेश गायकवाड
गुरुवार, 9 जुलै 2020

जिल्ह्यात कोरोनाचे मृत्यूसत्र सुरूच आहे. बुधवारी चार रुग्णांच्या मृत्यूनंतर आज एका २८ वर्षीय तरुणाचा कोरोना विषाणूने बळी घेतला. तर आणखी १९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

जालना :  जिल्ह्यात कोरोनाचे मृत्यूसत्र सुरूच आहे. बुधवारी चार रुग्णांच्या मृत्यूनंतर आज एका २८ वर्षीय तरुणाचा कोरोना विषाणूने बळी घेतला. तर आणखी १९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
जालन्यात गेल्या आठवड्यापासून रोज कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत असून या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गुरुवारी सकाळी जालना शहरातील दुखीनगर येथील एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून हा जिल्ह्यातील ३५ वा बळी ठरला आहे. जालना शहरातील जुना जालना भागातील दुःखीनगर मधील तरुणाला त्याच्या नातेवाईकांनी (ता.७) जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या तरुणाचा कोरोनाचा अहवाल बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना सकाळी या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

दरम्यान कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १९ संशयितांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहे. यात जालना शहरातील विविध भागातील अठरा जणांचा समावेश आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. जालना शहरात पसरलेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात दहा दिवसाचा लॉकडाउन लागू असून आज त्याचा तिसरा दिवस आहे. या काळात प्रत्येक भागात घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक नागरिकांची तपासणी करत आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

जिल्ह्यात आतापर्यंत ८४७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ५०४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात ३१५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

संपादन : प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Corona Update one young person death