esakal | Corona Update: दिलासादायक! जालन्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Corona Update: दिलासादायक! जालन्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना: जिल्ह्यात शनिवारी (ता. ३१) १२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली तर सात रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शनिवारी (ता. ३१) तब्बल चार हजार २८७ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये जालना शहरातील तीन, तालुक्यातील गोंदेगाव येथील एक, घनसावंगी तालुक्यात शेवता, पाडळी, अंबड शहर, तालुक्यातील डोमलगाव, शहागड, बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी, धामनगाव येथील प्रत्येकी एकचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आतापर्यंत ६१ हजार ४५६ कोरोनाबाधित आढळून आले आहे. दरम्यान, सात कोरोना सक्रिय रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ६० हजार १८९ रुग्णांनी उपचारानंतर कोरोनाला हरविले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एक हजार १७९ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात सध्या ८८ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: ‘डोळे वटारून काय बघतोय’ म्हटल्यामुळे तरुणाचा खून

जालना कोरोना मीटर
एकूण कोरोनाबाधित : ६१,४५६
एकूण कोरोनामुक्त : ६०,१८९
एकूण मृत्यू : ११७९
आजचे मृत्यू : ००
आजचे बाधित : १२
आजचे मुक्त : ०७
उपचार सुरू : ८८

loading image
go to top