esakal | ‘डोळे वटारून काय बघतोय’ म्हटल्यामुळे तरुणाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

‘डोळे वटारून काय बघतोय’ म्हटल्यामुळे तरुणाचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उदगीर (लातूर): ‘दादा, डोळे वटारून काय बघतोय?’ असे विचारल्यामुळे एकाने तरुणाला चाकूने भोसकले. ही घटना गुरुवारी (ता.२९) रात्री येथील रेल्वेस्टेशनजवळील बसवेश्वर चौकाजवळ घडली. या प्रकरणी शुक्रवारी (ता. ३०) शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. जगदीश किंवडे असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी सुनीता विजय किंवडे यांनी तक्रार दिली. त्यांनी तक्रारीत नमूद केले की, त्यांचा मुलगा जगदीशने रेल्वेस्टेशनजवळील बसवेश्वर चौकातील वोडाफोन सेंटरच्या समोरील रस्त्यावर सोन्या नाटकरे (वय ३०) याला ‘‘दादा, माझ्याकडे डोळे वटारून काय बघतोय?’ असे विचारले. तेवढ्यात जगदीशला कोणाचा तरी फोनकॉल आला. फोनवर बोलताना नाटकरे याने कमरेला असलेला चाकू काढून जगदीशच्या पोटात वार केला. यात जगदीश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी लातूरला नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा: नितीन गडकरी मला तुमची मदत हवी आहे - मुख्यमंत्री ठाकरे

या तक्रारी आधारे पोलिसांनी नाटकरे याच्या विरोधात गुन्हा नोंद केला. उपविभागीय अधिकारी डॅनियल बेन, पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक व्ही. आय. एडके तपास करीत असून, नाटकरे फरार आहे.

loading image
go to top