Jalna : पत्नीनेच केला पतीचा खून

टीव्ही सेंटर येथील प्रमोद झिने खून प्रकरणाचा पर्दाफाश
Crime
Crime sakal

जालना - जालना-सिरसवाडी रस्त्यावरील टीव्ही सेंटर येथील घरासमोर प्रमोद जनार्दन झिने याचा रविवारी (ता.सात) सकाळी पलंगावर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. दरम्यान, अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने खून केल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने संशयित महिलेस ताब्यात घेतले आहे.

शहरातील टीव्ही सेंटर येथील घरासमोर झोपलेल्या प्रमोद जनार्दन झिने याचा रविवारी सकाळी खून झाल्याचे उघड झाले होते.

त्यात प्रमोद झिने याच्या डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. या खून प्रकरणी पत्नी आशा झिने हिने दिलेल्या फिर्यादीवरून हा खून प्रेम प्रकरणातून एका महिलेने केल्याचा तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात पोलिसांना संशय आला.

Crime
Mumbai : पावसाळ्यापूर्वीच नाले सफाईवरून रेल्वे-पालिकेत जुंपली? रेल्वे विभागाने व्यक्त केली नाराजी !

पोलिसांनी तांत्रिक तपास करत फिर्यादी हिच संशयित असल्याची माहितीचे पुढे आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मयताची पत्नी आशा परमेश्वर ऊर्फ प्रमोद झिने हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यात पती प्रमोद हा दारू पिवून नेहमी मारहाण करत होता. मागील दीड वर्षापूर्वी तिचे व तिचा साथीदार रूपेश योहानराव शिंदे (रा. रेवगाव ता.जालना) यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या प्रेम संबंधाची माहिती पती प्रमोदला कळाली.

त्यामुळे आशा हिला पती प्रमोद नेहमी मारहाण करत होता. त्यामुळे मागील एक महिन्यापासून पतीस ठार मारण्याचे तिने ठरविले होते. त्यातच शनिवारी (ता. सहा) रात्री पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. रात्री बारा साडेबारा वाजेच्या दरम्यान तिने घराबाहेर येऊन पती प्रमोद झोपल्याची खात्री करून घेतली.

Crime
Mumbai Local : मेगाब्लॉकने ऐन लग्नसराईत मुंबईकरांचे मेगाहाल

त्यानंतर आशा हिने पती प्रमोद याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार केले. त्यानंतर घडलेली घटना तिने प्रियकरास सांगितली. दोघांनीही आपसात भेटून विचार विनिमय करून पतीचे प्रेमसंबंध असलेल्या महिलेच्या नावाने तक्रार देण्याचे ठरविले.

ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजेच्या दरम्यान झोपेतून उठून आशाने आरडाओरडा केला. शेजारी व नातेवाईक जमा करून पतीस त्याच्या प्रेयसीने मारल्याचा बनाव केला. पोलिसांत तशी तक्रार देखील केली.

दरम्यान, संशयित आशा झिने हिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगत स्थानिक गुन्हे शाखेने आशा व तिचा प्रियकर रूपेश योहानराव शिंदे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, अंमलदार सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, संभाजी तनपुरे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, फुलचंद गव्हाने,

रंजित वैराळ, भाऊराव गायके, गोपाल गौशिक, सुधीर वाघमारे, योगेश सहाने, कैलास चेके, भागवत खरात, सागर बावीस्कर, महिला अंमलदार चंद्रकला शडमल्लु, रेणुका वांडे चालक रमेश पैठणे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com