Jalna News : जालना जिल्हा हिवताप अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने पकडले

संशयितात जालना जिल्हा हिवताप अधिकाऱ्याचा समावेश
jalna
jalnasakal

जालना/छत्रपती संभाजीनगर, ता. १८ ः खात्यातील कर्मचाऱ्याच्या दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तिकेत घेण्यासाठी जालना जिल्हा हिवताप अधिकारी आणि इतर दोन कर्मचाऱ्यांनी १५ हजार रुपयांची लाच घेतली. त्या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) छत्रपती संभाजीनगर युनिटच्या पथकाने गुरुवारी (ता. १८) अटक केली.

जिल्हा हिवताप अधिकारी संतोष तोनगिरे (वय ५०), आरोग्य सेवक अण्णा तारू (वय ४५) आणि आरोग्य सहायक भारत एकनाथ गांगुर्डे (वय ५५) अशी लाचखोरांची नावे असून, तिघेही हिवताप कार्यालय शहर विभाग जालना येथे कार्यरत आहेत.

jalna
Jalna News : जालना बनतोय गुन्हेगारीचे केंद्र ; शहरात भर दिवसा पिस्तुलांचा वापर करून टाकले जाणारे दरोडे आणि खून

तक्रारदार हे या विभागात कार्यरत असून, ते दिव्यांग आहेत. त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तिकेत करावयाची होती. त्यासाठी तिघांनी २० डिसेंबर २०२३ आणि १६ जानेवारी २०२४ ला लाच मागितली होती. सुरुवातीला १० हजार नंतर २० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच मागितली.

दरम्यान, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली असता एसीबीने शहानिशा करून सापळा लावला. तोनगिरे याला लाच घेतानाच एसीबीने पकडले. दरम्यान, तोनगिरे आणि गांगुर्डे या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ही कारवाई एसीबीचे निरीक्षक हनुमंत वारे, सहायक सापळा अधिकारी हरिदास डोळे यांनी केली. त्यांना साईनाथ तोडकर, दिगंबर पाठक, अशोक नागरगोजे, रामेश्वर ताठे यांनी सहाय्य केले.

ही कारवाई एसीबीचे निरीक्षक हनुमंत वारे, सहायक सापळा अधिकारी हरिदास डोळे यांनी केली. त्यांना साईनाथ तोडकर, दिगंबर पाठक, अशोक नागरगोजे, रामेश्वर ताठे यांनी सहाय्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com