जालना जिल्ह्यातील 'मांगणी' नदीला पूर ! हजार एकर शेती पाण्याखाली ! 

दिलीप पवार
Saturday, 26 September 2020

अंकुशनगर परिसरात शुक्रवारी (ता.२५) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने या परिसरातील मांगणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीनीत पाणी शिरले आहे. 

अंकुशनगर (जि.जालना) : अंकुशनगर परिसरात शुक्रवारी (ता.२५) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने या परिसरातील मांगणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीनीत पाणी शिरले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अंकुशनगर परिसरात शुक्रवारी (ता.२५) जोरदार पाऊस झाला. परिणामी मांगणी नदीला पूर दुथडी वाहू लागली आहे. त्यामुळे नदी शेजारातील शेतांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे या भागातील जवळपास एक हजार एकरातील जमीन पाण्यात गेली. पिकांची नासाडी झाले आहे. यात ऊस, कपाशी, सोयाबीन, तूर, बाजरी, फळबाग, सौर पंप ही पाण्याखाली घेतल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तर मांगणी नदीला पूर आल्याने गोंदी- शहागड रस्ता बंद झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी गहिनीनाथनगर, मांगणी नदी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान मांगणी नदी ही पैठण तालुक्यातील केकस जळगाव येथून येत असून ही नदी अंबड तालुक्यातील चंदनापूरी, नालेवाडी, कृष्णनगर, गहिनीनाथनगर, पाथरवाला खुर्द, गोंदी येथे गोदावरी नदीला जाऊन मिळते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna District Mangani river full