Jalna News : जालना जिल्ह्याला मिळणार १३३ इलेक्ट्रिक बस

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून १३३ इलेक्ट्रिक बस खरेदी होणार
Jalna district will get 133 electric buses msrtc marathi news
Jalna district will get 133 electric buses msrtc marathi newsesakal

जालना : राज्य शासनाकडून एस.टी. महामंडळाच्या बस प्रवासामध्ये विविध सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, दुसरीकडे बसच्या संख्येत वाढ होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून १३३ इलेक्ट्रिक बस खरेदी होणार असून त्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील आगारांत दाखल होणार आहेत.

बसचा प्रवास, सुखाचा प्रवास अशी ओळख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आहे. शिवाय ग्रामीण भागात दळणवळणाचे सामान्यांसाठी महामंडळाची एसटी हा एकच पर्याय आहे. त्यात ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी बस हाच उत्तम आणि एकमेव पर्याय आहे. त्यात महाराष्ट्र शासनाने बस प्रवासाच्या तिकीट दरात विविध सवलती दिल्या आहेत. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना तिकीटावर पन्नास टक्के सवलत, विद्यार्थ्यांसाठी मासिक पास योजना आहे. यामुळे बसच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे.

मात्र, दुसरीकडे महामंडळाच्या बस संख्येत अपेक्षीत वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील चारही आगारांत एकूण २३५ बस आहेत. या बस आता वाढती प्रवासी संख्या ध्यानात घेत अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे मार्च अखेर जिल्ह्यातील जालना, अंबड, जाफराबाद, परतूर या चारही आगारांना नवीन १३३ इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यानुसार बस निर्मितीचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चारही आगारांत सध्या २३५ बस आहेत. बस प्रवाशांची संख्या नक्कीच वाढली आहे. यावर तोडगा म्हणून मार्च अखेरपर्यंत नव्या १३३ इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील चारही आगारात चार्जिंग स्टेशन निर्मितीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहे. शिवाय उच्चदाब वीज जोडणी निविदेचे कामही पूर्ण झाले आहे. लवकरच पायभूत सुविधांची कामे सुरू होतील.

— प्रमोद नेहूल,विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, जालना

३०० किलोमीटरची क्षमता

एकदा पूर्ण चार्जिंग केल्यानंतर ही इलेक्ट्रिक बस सुमारे ३०० किलोमीटर अंतर पार करू शकते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, बुलडाणा, मेहकर, जळगाव यासह जिल्हाअंतर्गत या बस चालविण्यात येणार आहेत. मार्चनंतर जिल्ह्यात इलेक्ट्रिक बस धावणार असून अपुऱ्या बस संख्येचा प्रश्‍न यामुळे मार्गी लागणार असून प्रवाशांची देखील यामुळे हेळसांड थांबण्यास मदत होणार आहे.

एकाचवेळी २५ बस होतील चार्ज

इलेक्ट्रिक बसला चार्जिंगसाठी किमान दोन तासांचा अवधी लागणार आहे. जिल्ह्यातील जालना, अंबड, जाफराबाद आणि परतूर या चारही आगारांत बस चार्जिंग स्टेशन निर्माण केले जाणार आहे. प्रत्येक आगारातील चार्जिंग स्टेशनवर एकाचवेळी २५ बस चार्जिंग व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

आगारनिहाय उपलब्ध बस

आगार - उपलब्ध बस

  • जालना - ७०

  • अंबड -६०

  • जाफराबाद -५५

  • परतूर -५०

  • एकूण -२३५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com