Jalna : ग्रामीण भागात निवडणुकीचा धुराळा

अनेकांना खुणावतेय सरपंचपद, मतदारांच्या भेटीगाठी सुरू
GramPanchayat News
GramPanchayat News sakal

पारध : भोकरदन तालुक्यातील ३२ तर परिसरातील १२ गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकीचा धुराळा आत्तापासून सुरू झाल्याचे चित्र आहे. तर आता थेट जनतेतूनच सरपंच निवडला जाणार असल्यामुळे अनेकांचा या निवडणुकीत मोठा कस लागणार असून, अनेक तरुणांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहे.

राजकारणाचा पाया म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेकांनी आपली राजकारणाची सुरुवात ही स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीतून केलेली आहे. तर शासनाकडून आता ग्रामविकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. अनेकांनी या निधीच्या माध्यमातून गावांचा चेहरामोहरा बदलला असल्याचे दिसून येते. हा निधी ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या खात्यावर येत असल्यामुळे गाव विकासाला मोठी चालना मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सरपंचपदाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांच्या चाचपणीसह मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. इच्छुक असलेल्या सरपंचपदाच्या उमेदवारांची नावे सोशल मीडियावर ग्रुप फिरत आहेत. कधी गावात, वॉर्डात न भेटणारे नेते, पदाधिकारी आता गल्लीबोळात मतदारांसोबत संवाद साधत आमच्याकडे लक्ष ठेवा असे सांगत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्ष न पाहता, ज्यांची गावात भावकी, गट मोठा आहे.

माणसांचे चारित्र्य, आर्थिक परिस्थिती, समाजात पत आपल्या अडीअडचणी कोण कामाला येतात, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असते. सध्या पारध परिसरातील १२ गावात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, त्यामुळे निवडणुकीचे वातावरण गरम होत आहे. अनेक गावात ग्रामपंचायतीवर वर्षानुवर्षे एकाच पक्षाची, गटाची सत्ता असल्यामुळे गावांचा विकास खुंटला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बदलाचे वारे वाहते काय याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

सरपंचपदाला महत्त्व

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सरपंच पदाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक तरुणांना सरपंचपद खुणावत आहे. त्यामुळे गावातील विविध वॉर्डात भेटीगाठी घेत मतदारांचा कल जाणून घेतला जात आहे. अनेकांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com