esakal | रेमडिसिव्हिर इंजेक्शनचे दहा हजार साठा आला, तुटवडा जाणवणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा


रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे दहा हजार साठा आला, तुटवडा जाणवणार नाही

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे दहा हजार साठा आला, तुटवडा जाणवणार नाही

sakal_logo
By
गणेश पिटेकर

जालनाः राज्यातील अनेक जिल्ह्यांत सध्या रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे. जालन्यात ही मागणी प्रमाणे रेमडिसिव्हिर इंजेक्शनाचा पुरवठा होत नव्हता. मात्र, बुधवारी (ता.१४) सकाळी जिल्ह्यात दहा हजार रेमडिसिव्हिर इंजेक्शनाचा साठा उपलब्ध झाला असून हा साठा जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करवा एजन्सीकडे देण्यात आल्याची माहिती औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त अंजली मिटरक यांनी दिली आहे.

अनेक कोरोना रुग्णांची प्रकृती खालावल्यानंतर या रुग्णांसाठी रेमडिसिव्हिर इंजेक्शन अतिमहत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात या रेमडिसिव्हिर इंजेक्शनाचा काळा बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून आता रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा साठ्यावर जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खासगी डाॅक्टरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रेमडिसिव्हिर इंजेक्शनची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरवठादाराकडे या इंजेक्शनची मागणी करतील.

त्यानंतर पुरवठादार एजन्सी कंपनीकडून मागणीप्रमाणे रेमडिसिव्हिर इंजेक्शनची मागणी करून शासनाने ठरवून दिलेल्या दराने हे रूग्णांना हे इंजेक्शन प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. जालन्यात करवा एजन्सीला रेमडिसिव्हिर इंजेक्शनची एजन्सी देण्यात आली आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल दहा हजार रेमडिसिव्हिरचे इंजेक्शन दाखल झाले आहेत. त्यामुळे पुढील काही महिने तरी जिल्ह्यातील रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवणार नाही.

loading image