‘मराठा समाजाला आरक्षण मिळत कसे नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’ यासह विविध घोषणांनी अंबड दणाणले

बाबासाहेब गोंटे
Sunday, 31 January 2021

पाचोड नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तहसिलदार विद्याचरण कडवकर यांना सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

अंबड (जि.जालना) : जालना जिल्ह्यातील अंबड शहरात जालना-बीड महामार्गावरील पाचोड नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करत अंबड शहरासह तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती वरून सकल मराठा समाज बांधव आपली दुचाकी, चारचाकी वाहनांवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची प्रतिमा असलेला भगवा झेंडा लावून कुटूंबातील सदस्यांसोबत रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. 

घर अवघ्या काही अंतरावर असतानाच काळाने घातला घाला, तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू

पाचोड नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तहसिलदार विद्याचरण कडवकर यांना सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. रविवारी(ता.३१) सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून वाहन रॅलीला सुरुवात झाली. सकल मराठा समाज बांधवांनी आरक्षण आमच्या हक्कांचे नाही कुणाच्या बापाचे, मराठा समाजाला आरक्षण मिळत कसे नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, या घोषणांनी अंबड शहर दणाणून सोडले होते. सकाळी काढण्यात आलेली वाहन रॅली अगदी शांततेत व नियमांचे पालन करत काढण्यात आली. 

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या

चोख पोलिस बंदोबस्त :  रविवारी सकाळी निघालेल्या वाहन रॅलीच्या वेळेस उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अंबड शहरातून वाहन रॅली साष्टपिंपळगावकडे हजारो वाहने मोठ्या स्थितीत रवाना झाली.
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Latest News Sakal Maratha Community's Vehicles Rally In Ambad