

Jalna Municipal Corporation Meeting Turns Heated Over Sanitation Tender Delay Accountant Removed From House After Resolution
esakal
-उमेश वाघमारे
जालना: जालना शहराच्या स्वच्छतेचे टेंडर मागील वर्षापासून झालेले नाही. त्यामुळे शहरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशात असलेल्या टेंडरची तपासणी करण्यात लेखाधिकारी असहकार्य करत असल्यामुळे वेळ लागत असल्याचा आरोप उपायुक्त नंदा गायकवाड यांनी केला. त्यानंतर सभागृहाने ठराव घेऊन लेखाधिकारी राजेश्वर माने यांना निलंबित करण्याचा ठराव घेत महापौर वंदना मगरे यांनी त्यांना थेट सभागृहातून बाहेर काढले.