Jalna News : जालना मनपाला जाग येते तेव्हाच होते प्लास्टिक बंदी

दोन दिवसांत ११० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त, ४५ हजारांचा दंड
jalna
jalnasakal

जालना : राज्य शासनाने राज्यात एकल प्लास्टिक बंदी केली आहे. मात्र, गुटखा बंदी प्रमाणे एकल प्लास्टिक बंदी ही कागदावर राहिल्याचे चित्र आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे मागील अनेक महिन्यांपासून विसर पडलेल्या प्लास्टिक बंदीची महापालिकेला आठवण झाल्याने मागील दोन दिवसांपासून प्लास्टिक बंदीसंदर्भात कारवाई सुरू केल्या आहेत. दोन दिवसात ९ दुकानांवर कारवाई करत १०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून ४५ हजारांचा दंड महापालिकेकडून ठोठावला आहे.

राज्य शासनाकडून पर्यावरण हाणीकारक असलेल्या एकल प्लास्टिक वापरावर १ जुलै २०२२ पासून संपूर्णतः बंदी घातली आहे. मात्र, तरी देखील प्रत्येक शहरासह गावागावात एकल प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा पावर होते. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा निर्णय हा गुटखा बंदीप्रमाणे झाल्याचे चित्र आहे. त्यात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला जाग येईल, तशी अवैध गुटख्यांवर कारवाई केली जाते. त्यात प्रमाणे एकल प्लास्टिक बंदीसंदर्भात महापालिकेला आठवण येईल, तशी कारवाई सुरू केली जाते. त्यात जालना शहर हे व्यापारी पेठ असल्याने शहरातील प्रत्येक दुकाना प्लास्टिक पिशव्यांचा खच पडलेला आढळून योते. मात्र, कारवाई ही नामामात्र दुकानांवर केली जाते.

त्यात महापालिकेच्या पथकाकडून मागील दोन दिवसांपासून शहरातील विविध किराणा, द्रोन विक्रेत्यांच्या दुकानांची झाडझडीत सुरू केली आहे. शहरातील चौका-चौकात गाडे लावून भाजीपाला विक्रेत्यांची तपासणी करून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या जात आहेत. महापालिकेच्या पथकाने शहरातील २ दिवसांमध्ये ९ दुकानांवर कारवाई करत १०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून ४५ हजारांचा दंड ठोठावला आहे. एकल प्लास्टिक बंदीसंदर्भात महापालिकेने सुरू केलेली ही कारवाई या पुढे अविरत सुरू राहणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

तर भाजापाला विक्रीला बंदी

महापालिकेडून शनिवारी (ता.१३) शहरातील चौका-चौकात भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची झाडाझडती घेऊन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. मात्र, हे भाजीपाला विक्रेते ऐवढा मोठा दंड भरू शकत नसल्याने त्यांना एकल प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका, अशा सूचना देण्यात आल्या. प्लास्टिक पिशव्या दिसून आल्यास भाजीपाला विक्रीसाठी बसून दिले जाणार नसल्याचे महापालिकेच्या पथकाने भाजीपाला विक्रेत्यांना बजावले आहे.

असा होऊ शकतो दंड

  • पहिल्या कारवाईत दुकानदाराकडे एकल प्लास्टिक पिशव्या मिळाल्यानंतर पाच हजारांचा दंड.

  • त्यात दुकाना दुसऱ्या कारवाई प्लास्टिक पिशव्या मिळून आल्यास दहा हजारांचा दंड.

  • त्याच दुकानात तिसऱ्या वेळी प्लास्टिक पिश्‍वाय मिळून आल्यानंतर ४५ हजारांचा दंड आणि दुकान मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

९५ दुकानांची तपासणी

प्लास्किट वापराच्या कारवाईसाठी महापालिकेकडून दोन पथके स्थापन करण्यात आले आहे. यात ११ स्‍वच्‍छता निरीक्षकांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून प्‍लास्‍टिक बंदी कारवाईदरम्यान शहरातील ९५ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. यात ११०

किलो प्‍लास्‍टिक जप्त करून वापराबाबत ९ दुकानदारांकडून प्रत्‍येकी ५ हजारांप्रमाणे ४५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com