भोकरदन परिसरात अस्वलाचा धुमाकूळ; २ जण जखमी

दीपक सोळंके
मंगळवार, 20 मार्च 2018

भोकरदन (जि. जालना): भोकरदन परिसरात व शहराजळील फत्तेपूर गावाच्या शिवारात आज (मंगळवार) सकाळी 10च्या सुमारास पाण्याच्या शोधात भरकटलेल्या एका अस्वलाने धुमाकूळ घातला. यावेळी अस्वलाने केलेल्या हल्ल्यात २ जण जखमी झाले

विजय अशोक सपकाळ (वय १६, रा.धनगरवाडी भोकरदन) व फत्तेपूर येथील रूखमबाई सारंगधर तळेकर (वय ४५) असे जखमींचे नाव आहे. विजय याच्या पायाला तर रुखमबाई यांच्या हाताला अस्वलाने चावा घेतल्याचे समजते.

दरम्यान, अस्वलाला पकडण्यासाठी जालना येथील वनविभागाचे चार अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून, आणखी एक पथक काही वेळात पिंजऱ्यासह फत्तेपूर गावात दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तूर्तास गावकरी व वनविभागाचे अधिकारी लाठ्या काठ्या घेऊन अस्वलाचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली. या घटनेने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: jalna news bhokardan bear attack two injured

टॅग्स