Jalna News : कपाशीच्या शेतात गांजाची लागवड

तालुक्यातील वंजार उम्रद येथील प्रकार, ११५ किलोची झाडे जप्त
Jalna News
Jalna NewsSakal

जालना : तालुक्यातील वंजार उम्रद येथील एका शेतकऱ्याच्या कपाशीच्या शेतातून गांजाच्या झाडाची लागवड केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. तालुका जालना पोलिसांनी छापा टाकून ११५ किलो गांजाची झाडे जप्त केला आहेत.

जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील संशयित सयाजी पालवे या शेतकऱ्याने कपाशीच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या माहितीची खात्री करून रविवारी या शेतात छापा टाकला. यावेळी पोलिसांना कपाशीच्या पिकात गांजाची झाडे मिळून आली. पोलिसांनी हे झाडे एकत्र करून त्याचे वजन केले असता ११५ किलो भरले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या गांजाची किंमत तब्बल २३ लाखांची असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गांजा लागवडीचे वाढले प्रकार

जिल्ह्यात शेतात कपाशी, तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड करण्याचे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे. आता मागील काही दिवसांपासून पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकून गांजाची झाडे जप्तीच्या कारवाया केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com