esakal | परीक्षेला जाणाऱ्या सौरभवर काळाचा घाला; अपघातात जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident news jalna.

दुचाकीवरून प्रवास करत असताना सौरभच्या डोक्यात हेल्मेट नसल्याने सिमेंट रस्त्यावर जोराची धडक बसल्याने ही अपघाताची घटना घडली आहे

परीक्षेला जाणाऱ्या सौरभवर काळाचा घाला; अपघातात जागीच ठार

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड (जालना): जालना महामार्गावरील लक्ष्मीकांत नगर जवळील तीन पुलाजवळ एका ट्रक चालकाने हुलकावणी दिल्याने एका बावीस वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना तालुक्यातील गोला (गणेशनगर) येथील सौरभ भगवान जोगदंड (वय 22) वर्षे हा सोमवारी (ता.5) सकाळी दहा ते सव्वा दहा वाजेच्या दरम्यान बी. ए. अंतिम वर्षाचा पेपर देण्यासाठी बदनापूर येथे जात होता.

गावापासून जालना शहराकडे जात असताना अंबडकडून येणाऱ्या माल ट्रकने लक्ष्मीकांतनगर जवळ असलेल्या पुलाजवळ ओव्हरटेक करताना हुलकावणी दिल्याने ट्रक पुढे जाताच ट्रकला दुचाकी जोराने धडकल्याने सौरभचा हा जागीच ठार झाला आहे. पदवी परीक्षेतून भविष्यात रोजगार मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सौरभ जोगदंड या विद्यार्थ्यांवर अखेर भरदिवसा घाला घातला आहे.

कोरोनाच्या १३ महिन्यांतला सर्वोच्च कहर, बीड जिल्ह्यात ३५१४ रुग्ण अॅक्टिव्ह

दुचाकीवरून प्रवास करत असताना सौरभच्या डोक्यात हेल्मेट नसल्याने सिमेंट रस्त्यावर जोराची धडक बसल्याने ही अपघाताची घटना घडली आहे. घटनास्थळावरून ट्रक चालकाने मात्र तात्काळ ट्रक घेऊन पलायन केले.

जालना येथे सौरभ जोगदंड याच्यावर शवविच्छेदन करून दुपारी तीन वाजता गोला (गणेशनगर) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सौरभच्या पश्चात आई, वडील व एक बारावी मध्ये शिक्षण घेत असलेला लहान भाऊ असा परिवार आहे.

loading image