जालन्यातून १३ जण वर्षभरासाठी हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

जालना - जिल्ह्यातील संघटित मटका चालविणाऱ्या दोन टोळ्यांमधील १३ जणांविरोधात कलम ५५ अंतर्गत पोलिस विभागाकडून एक वर्षाच्या हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. १३ जणांना शनिवारी (ता. २८) जिल्ह्यातून बाहेर सोडण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

जालना - जिल्ह्यातील संघटित मटका चालविणाऱ्या दोन टोळ्यांमधील १३ जणांविरोधात कलम ५५ अंतर्गत पोलिस विभागाकडून एक वर्षाच्या हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. १३ जणांना शनिवारी (ता. २८) जिल्ह्यातून बाहेर सोडण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी दोन संघटित मटका टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संघटित मटका चालविणाऱ्या ६३ जणांना कलम ६३ (१) अंतर्गत हद्दपारीची कारवाई का करू नये, अशा नोटिसा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी बजाविल्या होत्या. त्यानंतर त्याचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. नोटिसा बजाविल्यानंतर त्यांचे म्हणणे व चौकशी केल्यानंतर ६३ जणांपैकी १३ जणांविरोधात पोलिस निरीक्षक गौर यांनी कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमाअंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी कलम ५५ अंतर्गत पहिल्यांदाच या १३ जणांविरोधात एका वर्षाच्या हद्दपारीचे आदेश पारीत केले आहे. हद्दपारीचे आदेश पारीत केल्यानंतर या १३ जणांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. गौर व त्यांच्या पथकाने; तसेच सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पथकाने या १३ जणांना रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातून बाहेर सोडले. १३ जणांना औरंगाबाद, बीड, देऊळगावराजा, देऊळगाव माही, सिंदखेडराजा आदी ठिकाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कलम ५५ अंतर्गत हद्दपारीची कारवाई करण्याची ही जिल्ह्यातील पहिली, तर महाराष्ट्रातील दुसरी वेळ आहे. 

यांना केले हद्दपार 
कलम ५५ अंतर्गत पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी कमलकिशोर पुसाराम बंग (रा. कालीकुर्ती, जालना) व त्याच्या टोळीतील सुरेश बाबलाल अग्रवाल, प्रभुदास सांडुजी गायकवाड, मधुकर शिवाजी जोगदंड, कचरू श्रीकिसन पडोळ (सर्व रा. जालना) व शिवलिंगअप्पा छगनअप्पा वीर (रा. बरवार गल्ली, काद्राबाद) व त्याच्या टोळीतील नरेश हिरालाल वीर, दीपक बाबूराव सदावर्ते, शेख अमजद शेख मंन्सूर, दिनार विजय घुमारे, शेख वहाब शेख दाऊद शेख, कन्हैया गंगाराम दोडके, रमेश माधवराव सोनवणे (सर्व रा. जालना) यांच्यावर एक वर्षाची हद्दपारीची कारवाई केली आहे.

Web Title: jalna news marathwada