सुरक्षा आणि माणुसकीसह पोलिस प्रशासनाचा महिला उमेदवारांना हात

उमेश वाघमारे
बुधवार, 21 मार्च 2018

पोलिस भारतीसाठी महिला उमेदवार बाहेरगावावरून  येतात. त्यामुळे त्यांची राहण्याची सोय नसल्याने त्यांना हॉटेल किंवा इतर ठिकाणाचा आधार घ्यावा लागतो. पोलिस निवासस्थानी राहण्यासाठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे महिला उमेदवारांची राहण्याची व्यवस्था केली आहे.
- रामनाथ पोकळे, जिल्हा पोलिस अधीक्षक, जालना.

जालना : सध्या पोलिस भरती सुरु आहे. त्यामुळे पुरुष उमेदवारांसह महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. मात्र पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत माहिला उमेदवारांना हॉटेल, लॉज किंवा मिळेल त्या ठिकानी राहण्याची वेळ येते. त्यामुळं त्यांच्या खिशाला झळी सह अनेकदा सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन जालना पोलिस प्रशासनाने पोलिस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांच्या निवासाची सोया केली आहे. विशेष म्हणजे महिला उमेदवारांची राहन्याची व्यवस्था करणारा पहिला जालना जिल्हा आहे.

जालना जिल्ह्यात 50 जागांसाठी  पोलिस भरती प्रक्रिया सुरु आहे. या 50 जागांसाठी दहा हजार 250 अर्ज आले आहेत. मंगळवारी(ता.20) पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारपासून (ता.21) महिला उमेदवारांची शारीरिक चाचणीस सुरवात झाली आहे. पोलिस भरतीकाळात महिला उमेदवार हे बाहेरगावावरून येतात. त्यामुळे पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या महिला उमेदवार यांना हॉटेल, लॉज किंवा अन्यठिकानी राहण्याची वेळ येते. या महिला उमेदवारांच्या राहण्याची कोणतीही जबाबदारी ही पोलिस प्रशासनाची नसते. मात्र जालना पोलिस प्रशासनाने माणुकीचा हात देत आणि सुरक्षेच्या दृष्टीने या महिला उमेदवारांना पोलिस अधिकऱ्यांच्या निवासस्थानी राहण्याची सोया केली आहे. या महिला उमेदवारांना एक पोलिस अधिकारी निवासस्थान व दोन व्हॉल उपलब्ध करून दिले आहेत.  त्यामुळं महिला उमेदवारांचा नाहक खर्च आणि गैरसोय टळली असून  वेळेची बचत झाली आहे.या मुळे महिला उमेदवारांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

पोलिस भारतीसाठी महिला उमेदवार बाहेरगावावरून  येतात. त्यामुळे त्यांची राहण्याची सोय नसल्याने त्यांना हॉटेल किंवा इतर ठिकाणाचा आधार घ्यावा लागतो. पोलिस निवासस्थानी राहण्यासाठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे महिला उमेदवारांची राहण्याची व्यवस्था केली आहे.
- रामनाथ पोकळे, जिल्हा पोलिस अधीक्षक, जालना.

Web Title: Jalna news police social work