Jalna News: इंधन कंपन्यांना पैसे अदा न केल्याने १२ पंप बंद; शहरात पेट्रोल-डिझेल टंचाई, नागरिकांना इंधन मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागल्या

12 Petrol Pumps Closed in Jalna Due to Cash Payment Policy: जालना शहरातील १२ पेट्रोल पंप कंपन्यांकडून रोख रक्कम न मिळाल्यामुळे बंद झाले. नागरिकांना इंधन मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागल्या.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: युद्धामुळे इंधन पुरवठा विस्कळित झाल्याचा बनाव पेट्रोल पंप धारकांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात तेल कंपन्यांकडून उधारीवर (क्रेडिटवर) इंधन देणे बंद झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तेल कंपन्यांनी रोख रक्कम भरल्याशिवाय इंधन पुरवठा न करण्याचे धोरण स्वीकारल्याने अनेक पेट्रोल पंप मालक रोख रक्कम भरून इंधन उचलण्यास तयार नाहीत. परिणामी गुरुवारी (ता. २६) जालना शहरातील तब्बल १२ पेट्रोल पंप बंद होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com