
धनंजय मुंडे यांनी आपली बाजू सोशल मीडियावरुन जगजाहीर केली आहे.
जालना: प्यार किया तो डरना क्या, असे म्हणत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांना काही अर्थ नसल्याचे माध्यमांना सांगत त्यांची पाठराखण केली आहे. गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या संबंधांचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ते व्यथित झाले होते.
त्या मुलाचे नाव आणि संबंधित महिलेचे घर शोधून त्याच्या बातम्या झाल्या होत्या. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या रोखठोक शैलीत मुंडेंना पाठिंबा दिला होता. प्यार किया तो डरना क्या, असे म्हणत अशा प्रकरणात दम नसल्याचे त्यांनी जाहीररीत्या सांगितल्याची आठवण राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले.
ठेकेदाराचा दोष नागरिकांच्या मूळावर! शहराच्या बाह्य वळण रस्त्याचे कॉर्नर ठरतायेत अपघाताचे केंद्र
राजीनाम्याचा विषय नाही-
धनंजय मुंडे यांनी आपली बाजू सोशल मीडियावरुन जगजाहीर केली आहे. त्यामुळे भाजपने त्यांचा राजीनामा मागण्याचा विषय येत नाही, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुनावले आहे. बलात्काराच्या आरोपा प्रकरणी मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या यासह इतर भाजप नेत्यांची मागणी निरर्थक असल्याचे श्री.सत्तार यांनी सांगितले. जालना येथील टाऊन हाॅल येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बुधवारी (ता.१३) युवा सेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.
रावसाहेब दानवेंची विधानसभेत कुटीलनीती-
भाजपचे खासदार रावसाहेब दानवे हे माझे मित्र होते. मी त्यांच्या सोबत अनेक वर्ष राहिलो. गत लोकसभेत आम्ही त्यांना मदत केली. मात्र, त्यांनी विधानसभेत कुटीलनिती केली. त्यांनी जाहीर सभेत शिवसेनेला मदतान केले नाही, असे जाहीर केले. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत त्यांना इट का जवाब पत्थर देऊ असे राज्यमंत्री अब्बुल सत्तार यांनी म्हटले आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची ही उपस्थिती होती.
औरंगाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लू? पिशोरमधील अनेक कोंबड्या अचानक दगावल्या
श्री. सत्तार म्हणाले की, भाजपचे रावसाहेब दानवे हे मात्र मित्र होते. त्यामुळे त्यांना गत लोकसभा निवडणुकीत आम्ही मदत केली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना पैठण ते जालनापर्यंत कुटीलनिती केली. त्याची कबुली ही हरिभऊ बागडे यांच्या एका जाहीर सभेत त्यांनी दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांनी माझ्या मतदार संघात माझ्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे त्यांना पुढील लोकसभा निवडणुकीत इट का जवाब पत्थर से देऊ. त्यांनी जे विधानसभा निवडणुकीत केले त्याचे परिणाम त्यांना पुढील लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांच्या रूपाने भोगावे लागतील, असे ही श्री. सत्तार यांनी म्हटले आहे.
संपादन - गणेश पिटेकर