जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडsakal

Jalna : रेशीम शेतीत शाश्वत उत्पन्न देण्याची क्षमता

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड : कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी प्रशिक्षण शिबिर

जालना : शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधायची असेल तर रेशीम शेतीकडे वळावे. रेशीम शेतीत शाश्‍वत उत्पन्न देण्याची क्षमता आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केले आहे.

आत्माअंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय व खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे तुती बाग जोपासना, रेशीम किटक संगोपन व कोष विक्री व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण या विषयीचे गुरूवारी (ता.२३) एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर झाले.

यावेळी ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्र येथे झालेल्या शिबिराला कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, सेवानिवृत्त उपसंचालक दिलीप हाके, केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. रामप्रकाश वर्मा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.एस.व्ही.सोनुने, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, प्रा.अजय मिटकरी, रेशीम विकास अधिकारी बी.डी.डेंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, की शेतकऱ्यांनी तुतीची लागवड काड्यांऐवजी तुती रोपांनी केल्यास उत्पादनात पहिल्याच वर्षी पन्नास हजारांची वाढ होते. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखणारा रेशीम उद्योग आहे.

शेतकऱ्यांना सातत्याने शाश्वत उत्पन्न देण्याची क्षमता रेशीम शेती व उद्योगामध्ये आहे. जालना येथे रेशीम अंडीपुंज निर्मिती ते रेशीम धागा निर्मिती पर्यंतच्या सर्व प्रक्रिया उद्योग कार्यान्वित असून जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा स्वीकार करून आपले जीवन समृद्ध करावे. मी स्वत: माझ्या शेतामध्ये तुती लागवड करून रेशीम कोषांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी म्हटले.

यावेळी श्री. बोराडे म्हणाले, की रेशीम पीक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. रेशीम उद्योगावर बेमोसमी पाऊस, जास्तीचा पाऊस, दुष्काळ या वातावरणातील बदलांचा विशेष विपरीत परिणाम होत नाही. रेशीम उद्योगातील उत्पादन शाश्वत आहे. रेशीम उद्योग यशस्वी करण्यासाठी महिलांनी प्रशिक्षण घेणे आवश्यक असून कृषी विज्ञान केंद्र येथे महिलांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते. जिल्ह्यात रेशीम धागा तयार होत असून आता त्यापुढे जाऊन महिलांना प्रशिक्षित करून घरोघरी हातमागावर पैठणी साडी विणकाम होणे आवश्यक आहे, असे श्री. बोराडे म्हणाले.

यावेळी रेशीम विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक श्री. हाके म्हणाले, की रेशीम शेती ही गट शेतीप्रमाणे केल्यास अधिक फायदेशीर ठरते. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी एक एकर ऐवजी दोन एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केल्यास शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्यास वेतनाप्रमाणे रेशीम शेतीमधून उत्पन्न मिळते. तसेच रेशीम शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे बाबतीत दत्तक घेऊन काम केल्यास प्रत्येक शेतकरी रेशीम उद्योगामध्ये १०० टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
Jalna Crime News: जमिनीचा वाद! तोंडात चिखल टाकत, गळा आवळून सावत्र भावाचा खून

केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. वर्मा यांनी शेतकऱ्यांना निर्जंतुकीकरण व सुधारित तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले. रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी तुती बाग व्यवस्थापन, किटक संगोपन तंत्रज्ञान या विषयी शेतकऱ्यांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. तर प्रस्तावना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.एस.व्ही.सोनुने यांनी केली.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
Jalna : ST बसच्या प्रवासी संख्येत वाढ ; महिलांना तिकिटात सवलतीचा परिणाम

यावेळी जिल्हाधिकारी राठोड यांचे हस्ते नव्याने रेशीम उद्योग करून १०० अंडीपुंजास १०० किलो पेक्षा जास्त उत्पादन घेणारे मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील युवा शेतकरी राज मुळे, नांजा (ता.भोकरदन) येथील रेशीम उत्पादक शरद मोरे व पुष्पा शरद मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com