Jalna Rain Update : जालना शहरात बरसला जोरदार पाऊस; दोन दिवस यलो अलर्ट

रस्त्यावर साचले पावसाचे पाणी, जिल्ह्यात दोन दिवस यलो अलर्ट
Jalna Rain Update
Jalna Rain Updatesakal

जालना : शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी (ता.१३) पावसाच्या सरी कोसळल्या. जालना शहरात सायंकाळी पाऊस पडला. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

जिल्ह्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाला आहे. परिणामी यंदा पावसाने सरासरी ही गाठली नाही. अशात कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राकडून जिल्ह्यात गुरुवार (ता.१३) ते शनिवारी (ता.१५) यलो अलर्टचा इशारा देण्यात आला होता.

त्यानुसार गुरुवारी सायंकाळी शहरात आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सात वाजेच्या सुमारास शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात शहरात हा पहिला जोरदार पाऊस जालनेकरांना अनुभवण्यास मिळाला.

Jalna Rain Update
Jalna News : जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली; शासकीय कामकाजात गतिमानता

शिवाय रात्री उशिरापर्यंत शहरात पावसाच्या सरी कोसळत होत्या. पुढील दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला तर पेरणीचा प्रश्‍न मार्गी लागेल. शिवाय पावसाची तूट भरू निघण्यास मदत होईल.

जिल्ह्यात ६८ मिलिमीटर पावसाची तूट

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २०२.३८ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होता. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात १३४.४० मिलिमीटर पाऊस पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात ६८ मिलिमीटर पावसाची तूट आहे.

Jalna Rain Update
Jalna Rain Update : जालन्यात तासभर जोरदार पाऊस; दिवसभर अधूनमधून रिमझिम सरी; छत्री, रेनकोटचा वापर सुरू

दरम्यान गुरूवारी (ता.१३) सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ६.५० मिलिमिटर पाऊस झाला आहे. जालना तालुक्यात १.४० आतापर्यंत १३२.४०, बदनापूर तालुक्यात ४.५० आतापर्यंत १४९.३०,

भोकरदन तालुक्यात २१.२० आतापर्यंत १५७.७०, जाफराबाद तालुक्यात २२.२० आतापर्यंत १५३.७०, परतूर तालुक्यात ०.१० आतापर्यंत १०८.९०, मंठा तालुक्यात ०.९० आतापर्यंत ८४.८०, अंबड तालुक्यात आतापर्यंत १९८.४०, घनसावंगी तालुक्यात आतापर्यंत ११६.५० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com