

Second Leopard Attack in Rui Within Twenty Days Creates Panic
Sakal
अशोक चांगले
सुखापुरी : अंबड तालुक्यातील रुई परिसरात बिबट्याचे वाढते आतंकामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी पंढरीनाथ प्रभाकर राजगुरू यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे, गेल्या वीस दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधलेल्या कालवडीच्या दिशेने पहाटेच्या सुमारास मोठा आवाज आल्याचे कुटुंबीयांच्या कानावर गेले.