आता होणार शाळा अन्‌ शिक्षकांचे मूल्यमापन

सुहास सदाव्रते
मंगळवार, 10 जानेवारी 2017

- सात विविध मुद्यांच्या आधारे द्यावी लागेल माहिती

जालना - राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि शिक्षकांचे आता मूल्यमापन केले जाणार आहे. शाळांना विशिष्ट कोड दिला जाणार असून. दोन वर्षांची माहिती आता शाळांना भरावी लागणार आहे. शिक्षकाची कामगिरी यासह शाळेचे सामर्थ्य स्त्रोत यातून तपासले जाणार आहेत.

- सात विविध मुद्यांच्या आधारे द्यावी लागेल माहिती

जालना - राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि शिक्षकांचे आता मूल्यमापन केले जाणार आहे. शाळांना विशिष्ट कोड दिला जाणार असून. दोन वर्षांची माहिती आता शाळांना भरावी लागणार आहे. शिक्षकाची कामगिरी यासह शाळेचे सामर्थ्य स्त्रोत यातून तपासले जाणार आहेत.

राज्यात आता जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान राबविण्याबाबत सोमवारी (ता.9) राज्याच्या शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात आला आहे. हे अभियान राबविताना यामध्ये शाळा सिद्धी या घटकाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यासाठी आता राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना मूल्यमापनासाठी ऑनलाइन माहिती सादर करावी लागणार आहे. शाळांनी शैक्षणिक वर्ष 2015 ते 2017 या दोन वर्षाची माहिती यात भरावयाची आहे. शाळांना सात विविध मुद्यांच्या आधारे माहिती देऊन त्याचे मूल्यमापन चार श्रेणीत केले जाणार आहे. मूल्यमापनात शाळेचे सामर्थ्य स्त्रोत, अध्यापन अध्ययन आणि मूल्यांकन, विद्यार्थी प्रगती, संपादणूक आणि विकास, शिक्षकांची कामगिरी, विकास व्यवस्थापन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, समावेशन, आरोग्य आणि संरक्षण, समाजाचा सहभाग आदी विविध मुद्ये असतील, त्याआधारे गुण दिले जाणार आहेत. शाळेचे सामर्थ्य स्त्रोत या घटकाला सर्वाधिक गुण देण्यात आले आहे. तर अध्यापन अध्ययन आणि मूल्यांकन या घटकासाठी नऊ गुण असणार आहेत. मूल्यांकनात शाळांना ए,बी,सी,डी, अशी श्रेणी दिली जाणार असून विद्याप्राधिकरणाकडून बाह्य मूल्यमापन केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एका निर्धारकांची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील महिन्यातील 28 तारखेपर्यंत संबंधित माहिती ऑनलाइन करणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रगत शाळांना भेटी, प्रत्येक वर्ग डिजिटल करणे, तंत्रस्नेही शिक्षक, ई-साहित्यांचा वापर वाढविणे, माहिती तंत्रज्ञान विषय, पर्यवेक्षकीय यंत्रणा आणि शाळा नेतृत्व प्रशिक्षण आदी विविध बाबींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

शालेय दर्जा दिसून येईल..
शाळा सिद्धीसाठी शाळांनी ऑनलाइन माहिती भरावयाची आहे. यात विद्यार्थी प्रगती आणि संपादणूक यासह शाळेचे सामर्थ्य स्तोत आणि शिक्षकाची कामगिरी कशी आहे, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. कालच शासनाने जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानबाबतचे आदेशही दिले आहे.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी माध्यमिक, जालना
 

Web Title: Jalna school teachers