esakal | जालन्यात साहित्यिकांचे अनोखे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

jalna.

जुना जालना गांधी चमन येथे सकाळी दहा वाजता गदिमांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात झाली

जालन्यात साहित्यिकांचे अनोखे आंदोलन

sakal_logo
By
सुहास सदाव्रते

जालना : महाकवी, आधुनिक गीतरामायणाचे जनक ग.दि. माडगूळकर यांचे पुणे येथे स्मारक उभारणीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. सदर काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी राज्यभर सोमवारी ( ता.१४ ) आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यात चित्र-शिल्प, कविता गीतगायनाने अनोखे आंदोलन करण्यात येत आहे.

जुना जालना गांधी चमन येथे सकाळी दहा वाजता गदिमांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात झाली. या वेळी आंदोलनाचे जिल्हा समन्वयक अरुण घोडे, मसाप जालना शाखेचे अध्यक्ष प्रा.रमेश भूतेकर, डाॅ.सुहास सदाव्रते,चित्रकार संतोष जोशी,चित्रकार मुकुंद दुसे, रामदास कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

गावगाड्याचे राजकारण आता तापणार; बदनापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका

पुणे येथे गदिमांच्या स्मारकाच्या कामात दूर्लक्ष होत आहे.चार दशकांपासून प्रश्न प्रलंबित आहे. स्मारकाचे काम तातडीने सुरु व्हावे यासाठी राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे.गदिमा यांच्या स्मृतिदिना निमित्त  सोमवारी (ता.१४ ) जालन्यात सुरुवात झाली.

चित्रकार संजय बोधेकर यांनी सहभाग घेत गदिमाचे शिल्प साकारले आहे. चित्रकार मुकुंद दुसे यांनी ग.दि.माडगूळकर यांचे अप्रतिम चित्र रेखाटले आहे.
चित्रकार संतोष जोशी,चित्रकार गंगाधर जोशी यांनी चित्र रेखाटत आंदोलनात सहभाग घेतला आहे.

अबब! महापालिकेच्या साउंड सिस्टीमचं तब्बल ३५ लाखांहून अधिक बिल

कवी कथाकार डाॅ.प्रभाकर शेळके हे गदिमाच्या कविता सादर करणार आहे. जालन्यातील अनेक कलावंत सहभागी होऊन आपली कला सादर करीत आहेत. यात  गदिमा यांचे पोर्ट्रेट  सोलाट यांनी रेखाटले. शिल्पकार संजय गोधेकर,मुकुंद दुसे,संतोष जोशी , गणेश पारे, गंगाधर जोशी,  बालकलाकार चि. वैद्य व कु. पायल,  दिनेश संन्यासी हे गदिमा यांची गीते सादर करणार आहेत.  साहित्यिक चित्रकार अरूण घोडे, डॉ. प्रभाकर शेळके, सुहास पोतदार, संतोष जोशी, मुकुंद दुसेसह  कवी गदिमा यांच्या कवितांचे वाचन करणार आहेत.

(edited by- pramod sarawale)

loading image