जालना जिल्हा परिषद होणार पेपरलेस

जालना जिल्हा परिषद
जालना जिल्हा परिषद

जालना, ता.10ः जिल्हा परिषदेत सर्वत्र दिसून येणाऱ्या पिवळ्या, हिरव्या, पांढऱ्या रंगाच्या कागदपत्रांचे गाठोडे लवकरच कालबाह्य होणार आहे. आधुनिकतेच्या युगात जुन्या पद्धतीला फाटा देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेत संगणकीकृत दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन वर्षांत सर्व जुन्या नस्त्या व दस्तऐवजांचे स्कॅनिंग करून त्या डिजिटल प्रणालीवर जतन केल्या जाणार आहेत.


जिल्हा परिषदेतील विविध विभागांत सध्या मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या कागदपत्रांचा ढीग पडला आहे. यातून आवश्‍यक कागदपत्रे शोधताना कर्मचाऱ्यांची बऱ्याचदा दमछाक होते; तसेच फायली गहाळ होण्याचे प्रकारही घडतात. या सर्व समस्या आता दूर होणार असून, संगणकावर एका क्‍लिकवर काही क्षणात ही माहिती हव्या त्या वेळेस उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेत साठवल्या जाणाऱ्या कागदपत्र व नस्तांच्या जतनासाठी ग्रामविकास विभागाने दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला असून, सर्व जिल्हा परिषदांना जुन्या कागदपत्रांचे स्कॅनिंग सुरू करण्याच्या सचूना दिल्या आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबाद जिल्हा परिषदेत हा प्रयोग राबविण्यात येत असून लवकरच सर्व जिल्हा परिषदांमध्ये या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वर्ष 2021 पर्यंत जिल्हा परिषदेतील सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण करण्याचे नियोजन शासनाने आखले असून, त्यानंतर ही सर्व कागदपत्रे ऑनलाइन व्यवस्थेवर उपलब्ध होणार आहेत.

तीन भागांत होणार कागदपत्रांचे स्कॅनिंग

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत अनेक वर्षांपासून साठवण्यात आलेल्या कागदपत्रांचे तीन भागांमध्ये स्कॅनिंग करून जतन केल्या जाणार आहे. यामध्ये सर्वप्रथम सध्या नोंदणी कक्षामध्ये असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करण्यात येणार आहेत. दुसऱ्या भागात आर्थिक वर्षातील नस्त्या स्कॅनिंग नंतर त्यानंतर क्रमाने गेल्या जुन्या नस्ता स्कॅन करण्यात येणार आहे. शेवटी सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर सदर कागदपत्रे एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिली जाणार आहे.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com