जालना : उन्हात झाडाखाली, पावसात सभामंडपात भरते शाळा

इंदलगावच्या झेडपी शाळेची अवस्था, इमारतीची दुरुस्ती होईना
Jalna zilla prishad school bad Condition
Jalna zilla prishad school bad Condition

अंकुशनगर : अंबड तालुक्यातील इंदलगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने धोकादायक बनली आहे. वर्गखोल्यांवरील छताचे प्लास्टर गळून पडत आहे. त्यामुळे उन्हात झाडाखाली, पावसांत सभामंडपात शाळा भरत आहे.

इंदलगाव येथील शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून ३१ विद्यार्थी आहेत. तीन शिक्षक अध्यापन कार्य करतात. शाळा इमारतीच्या छताला तडे गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून शाळा सकाळी व्हरांड्यात भरते तर दुपारी अंगणवाडी, झाडाखाली, पाऊस आल्यावर सभामंडपात वर्ग भरविले जात आहेत. शाळेच्या देखभाल व दुरुस्तीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

येथील शाळेला वर्गखोल्या मंजूर करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे ता.२६ ऑगस्ट २०२१ रोजी ग्रामस्थांनी केली होती, त्यांनी वर्गखोल्या मंजुरीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तातडीने पत्र दिले होते.

मात्र अद्याप शाळा दुरुस्ती किंवा नवीन वर्ग खोल्या उभा करण्यात आल्या नाहीत. दरम्यान, पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहता शनिवारी (ता.सहा) ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान, शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी वैजीनाथ इंदलकर, अभिराज फोके, भीमराव सोनवणे, गजानन वैद्य, शिवाजी नजान, लक्ष्मण इंदलकर, बळीराम इंदलकर, प्रकाश सोनवणे, अभिमान वीर, राज नाईकवाडे, श्याम इंदलकर,विराज इंदलकर यांच्यासह ग्रामस्थ, पालकांनी केली आहे.

इंदलगाव येथील शाळेची दुरवस्था झाली आहे. शाळेच्या छताचे प्लास्टर गळून पडत आहेत. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून शासनाने येथील वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी द्यावी.

- वैजनाथ इंदलकर, अध्यक्ष, शालेय समिती, इंदलगाव

शाळेची इमारत मोडकळीस आल्याने मागील वर्षापासून विद्यार्थी झाडाखाली किंवा सभा मंडपात बसत आहेत. प्रशासनाला निवेदन देऊनही वर्गखोल्या बांधकामाबाबत कुठलीही हालचाल झाली नाही. विद्यार्थ्यांसह शिक्षकांची हेळसांड होत आहे. वर्गखोल्यांबाबत पावले उचलावीत.

- अभिराज फोके, ग्रामस्थ, इंदलगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com