भोई समाजबांधवांचे माजलगांव जलाशयावर जलसमाधी आंदोलन

Jalsamadhi agitation on the Majalgaon water reservoir of Bhoi community
Jalsamadhi agitation on the Majalgaon water reservoir of Bhoi community

जि. बीड, माजलगांव : स्थानिक मच्छिमार भोई समाज मागील अनेक वर्षांपासून मच्छिमारी करून उपजिवीका भागवितात. येथील जलाशयावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या वतीने आज (ता. 28) गुरूवारी जलाशयावर जलसमाधी आंदोलन केले. 

माजलगांव जलाशयाचे जलक्षेत्र सात हजार 292 हेक्टर एवढे असुन जलाशयावर भोई समाज परंपरागत मच्छेमारी करतात. भोई समाज व ठेकेदार यांचा वाद कायम चालु असल्यामुळे ता. 26 जानेवारीस देवगाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी लेखी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने आंदोलनाचा पवित्रा घेत आज येथील जलाशयावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. माजलगांव जलाशयाचा 2019 ते 2020 पर्यंतचा मासेमारी तलाव ठेका रद्द करण्यात यावा, मच्छिमारांवर अन्याय करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ अटक करावी, खोटे गुन्हे दाखल करून घेणाऱ्या पोलिसांना निलंबीत करण्यात यावे या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी मच्छिमार संघर्ष समितीच्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात भोई समाजबांधव सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलनस्थळी दंगल नियंत्रण पथक, अग्निशामन दल व रूग्णवाहिकेसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com