esakal | ट्रकचालकांच्या मदतीला आला ‘जनता चहल ढाबा’
sakal

बोलून बातमी शोधा

kalamnuri photo

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूनंतर लगेच लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका लांब पल्ल्याची मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांनाही बसला आहे. जनता चहल ढाबा  येथे जवळपास ३० परप्रांतीय ट्रकचालक अडकले असून  त्यांच्या जेवनाची मोफत व्यवस्था करण्यात येत आहे. 

ट्रकचालकांच्या मदतीला आला ‘जनता चहल ढाबा’

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी(जि. हिंगोली) : जनता कर्फ्यूपासून अडकून पडलेल्या ३० ट्रकचालक व त्यांच्या सहायकांची दोन वेळेस जेवण, चहा, नाष्ट्याची जबाबदारी जनता चहल ढाबाचे मालक जगतारसिंह चहल यांनी उचलली आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून पायी जाणाऱ्या परप्रांतीय व अडचणीत सापडलेल्या वाहनधारकांना त्यांनी विनामूल्य जेवण देत आपले दातृत्व दाखवून दिले आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूनंतर लगेच लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका लांब पल्ल्याची मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांनाही बसला आहे. जनता कर्फ्यूमध्ये राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रकचालक कळमनुरी - आखाडा बाळापूर मार्गावर असलेल्या जनता चहल ढाब्यावर मुक्कामी थांबले आहेत.

हेही वाचाहिंगोलीत दोघांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे प्रलंबित

३० परप्रातीय ट्रकचालक अडकले

 मात्र, त्यानंतर लगेच सुरू झालेल्या लॉकडाउननंतर दिल्ली, चेन्नई, पंजाब, हैदराबाद, राजस्थान, इंदौर, हरियाणा या ठिकाणचे माल उतरवणारी गोदामे बंद झाल्याचा निरोप मिळाल्यानंतर जवळपास ३० परप्रांतीय ट्रकचालकांनी या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनंतर ट्रकचालकांकडील पैसे संपल्याचे ढाबाचालक जगतारसिंह चहल यांच्या लक्षात आले.

विनामोबदला नियमित आहार 

परप्रांतातील ट्रकचालकांची अडचण लक्षात घेत जगतारसिंह यांनी त्यांच्या ढाब्यावर थांबलेल्या प्रत्येक ट्रकचालकाला व त्यांच्या सहकाऱ्यांना दोन वेळेस जेवण, एक वेळेस नाश्ता, तीन वेळेस चहा असा नियमित आहार विनामोबदला देणे सुरू केले आहे. याकरिता त्यांनी बाजारपेठ सुरू झाल्यानंतर किराणा सामान व भाजीपाला खरेदी करण्याकरिता स्वतः पुढाकार घेतला आहे. 

जेवन पुरविण्यासाठी धाबा चालकाचे कुटुंबीय सरसावले

त्यांना दररोज ५० किलो आटा, पंधरा किलो साखर, ३० लिटर दूध, पंधरा किलो खाद्यतेल व भाजीपाला लागत आहे. एवढ्या मोठ्या लोकांचा स्वयंपाक करण्याकरता त्यांनी आपल्या कुटुंबातील महिलांना सहभागी करून घेतल आहे. तसेच इतर दोन महिला कामगारांनाही स्वयंपाकांसाठी कामावर ठेवले आहे. त्यांचा सहकारी लक्ष्मण मस्के हा भाज्या व चहा पाणी देण्यासाठी चालकांच्या सेवेत आहे.

शेकडो वाटसरूंना विनामूल्य जेवण

 विशेष म्हणजे या ट्रकचालकांकडून कुठलाही मोबदला घेतला जात नाही. यासोबतच जगतारसिंह चहल यांनी या मार्गावरून निजामबादकडे पायी जाणाऱ्या शेकडो वाटसरूंना विनामूल्य जेवण, चहा, नाश्ता दिला आहे. अडचणीत सापडलेल्या इतर वाहनधारकांनाही या काळात त्यांनी जेवण देण्याचा संकल्प केला आहे.

येथे क्लिक करा - तीन दिवसांच्या बंदनंतर गर्दीची एकच झुंबड, कुठे ते वाचा...

सर्वांची काळजी घेण्याचा मानस

ढाब्यावर नियमितपणे येणाऱ्या ट्रकचालकांच्या चहा-पाणी, नाष्टा व जेवणाची व्यवस्था करीत आहे. आता आपणासही अडचणी जाणवत आहेत. मात्र, लॉकडाउन उठेपर्यंत या सर्वांची काळजी घेण्याचा आपला मानस आहे.
-जगतारसिंह चहल, जनता ढाबा, आराटी

 

केलेली मदत अनमोल

सोळा दिवसांपासून येथील ढाब्यावर अडकून पडलो आहोत. जवळचे पैसे संपल्यानंतर ढाबाचालक व त्यांच्या कुटुंबीयांनी तीस ट्रकचालक व त्यांच्या सहकाऱ्यांची विनामोबदला जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली आहे. अडचणीच्या काळात त्यांनी केलेली मदत अनमोल आहे.
-बबलू खान, ट्रकचालक, दिल्ली
 

loading image
go to top