जनता कर्फ्यूत अतिउत्साही रस्त्यावर फिरले, परळीत गुन्हे दाखल 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 March 2020

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरस पसरु नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.२२) जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या आवाहानाल संपूर्ण देशात मोठा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद येथेही मिळाला पण काही अतिउत्साही व्यक्ती या जनता कर्फ्यू च्या काळातही रस्त्यावर फिरताना दिसले. अशा कायदेभंग करणाऱ्या व्यक्तींवर शहर संभाजीनगर पोलीस ठाण्यात साथ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परळी वैजनाथ (जि. बीड): कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.२२) केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला परळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.पण, स्वतःसह इतरांचे आयुष्य धोक्यात आणणाऱ्या अतिउत्साही व्यक्ती कायदाभंग करून रस्त्यावर फिरत होते. त्या व्यक्तींवर साथ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरस पसरु नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.२२) जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या आवाहानाल संपूर्ण देशात मोठा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद येथेही मिळाला पण काही अतिउत्साही व्यक्ती या जनता कर्फ्यू च्या काळातही रस्त्यावर फिरताना दिसले. अशा कायदेभंग करणाऱ्या व्यक्तींवर शहर संभाजीनगर पोलीस ठाण्यात साथ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा- कोरोनाच्या माहितीसाठी मुंबई, पुण्यातून सर्वाधिक सर्च

यामध्ये अन्सार अफसर शेख (रा. हबीबपुरा), विशाल कांदे (रा. जिरेवाडी), नदीम खान (रा. मलिकपुरा), सौरभ तंबूड (रा. माधवबाग), शेख अलीम (रा. हबीबपुरा), सिद्धेश्वर साबळे (रा. जलालपूर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे. संपूर्ण राज्यात रविवारी (ता.२२) रात्री पासून १४४ जमावबंदी चे कलम लागू करण्यात आले असून शहरातील नागरिकांनी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येवू नये असे आवाहन शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. कदम व श्री. पवार यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janta Curfew Offene Ragister Parli Beed