‘कोरोना’साठी पिंपरी चिंचवड, मीरा भाइंदर, नवीन मुंबईत सर्वाधिक सर्च 

‘कोरोना’साठी पिंपरी चिंचवड, मीरा भाइंदर, नवीन मुंबईत सर्वाधिक सर्च 

औरंगाबाद : जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू आहे. यानंतर भारतातसुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने तसेच केंद्र, राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना केल्यानंतर नेटिझन्सकडून गुगल सर्चमध्ये कोरोना व्हायरस आणि कोविड-१९ या शब्दांचे सर्वाधिक सर्चिंग होत आहे.

१५ ते २२ मार्च दुपारी दीडपर्यंत देशात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक सर्चिंग हे गोवा, दमन दीव, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली तर महाराष्ट्रात सर्वाधिक सर्चिंग हे पिंपरी चिंचवड, मीरा भाइंदर, नवीन मुंबई, ठाणे शहरातून झाले. 

चीननंतर कोरोना व्हायरस जगभर परसला. भारतातही कोविड-१९ चे रुग्ण आढळले. यानंतर केंद्र सरकार, राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना, आरोग्य विभागाकडून सूचनांचा भडिमार झाल्याने लोकांनी नेमका कोरोना व्हायरस आहे तरी काय? कोविड-१९ काय आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी सर्चिंग सुरू केले.

मागील सात दिवसांत कोरोना व्हायरस सर्वाधिक सर्च होत असल्याने हा विषय टॉप ट्रेंडमध्ये आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा मुंबई, पुण्यात सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याने कोरोना व्हायरस नावाने मागील सात दिवसांत सर्वाधिक सर्चिंग हे पिंपरी चिंचवड, मीरा भाइंदर, नवीन मुंबई, ठाणे, उल्हासनगर, वाशी, मुंबई, डोंबिवली, कल्याण, देहू रोड, अंबरनाथ, विरार, नालासोपारा, भाइंदर, बदलापूर या भागातून झाले आहे. 

असे झाले सर्चिंग 

१५ मार्चपासूनची आकडेवारी बघितली तर जगात कोरोना व्हायरस नावाने सर्वाधिक सर्चिंग स्पेन, फ्रान्स, इटली, युनायटेड किंगडम, पेरू, हंगेरी, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, स्वित्झरलँड, अमेरिका अशा टॉप टेन देशांचा क्रमांक लागतो. या देशांमध्ये सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरस नावाने भारताची सर्चिंग आकडेवारी बघितली तर गोवा, दमण दीव, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली, नागालँड, मेघालय, सिक्कीम, हरियाना, जम्मू-काश्‍मीरचा क्रमांक लागतो. कोविड-१९ नावाने मिझोरम, नागालँड, अंदमान निकोबार, मेघालय, सिक्कीम येथून सर्च झाले. 

हवीय नवीन माहिती 

कोरोना व्हायरसचे सर्चिंग होत असताना यामध्ये रिलेटेड क्युरीत कोरोना व्हायरस टिप्स, कोरोना सिम्प्टम्स डे बाय डे, लाइफ ऑफ कोरोना व्हायरस ऑफ सरफेस, वर्ल्डवाइड कोरोना केसेस, स्टेज ऑफ कोरोना व्हायरस, कोरोना व्हायरस स्टेज, कोरोना व्हायरस अपडेट वर्ल्डवाइड अशा शब्दांनी लोक सर्च करून माहिती घेत आहेत. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com