

Hunger Strike Begins Again: Jarange Targets Fadnavis Over Unfulfilled Promises
esakal
-दिलीप दखणे
वडिगोद्री: ना पाणी, ना जेवण, ना सावली... मी भर उन्हात शनिवार, ता. 30 रोजी अंतरवाली सराटी, ता. अंबड येथे ठरल्याप्रमाणे आमरण उपोषण करणार आहे. उष्माघाताने माझा बळी गेला, तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकार जबाबदार असेल, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.