सैनिक प्रविण गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

अमर रहे अमर रहे.. ..प्रविण गायकवाड अमर रहे..भारत माता की जय. .  या घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता. यावेळी औरंगाबाद येथील लष्कराच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. 

राणीसावरगाव : भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटचे जवान प्रविण शिवाजी गायकवाड (वय 23) यांच्या पार्थिवावर सोमवारी( ता. 27) रात्री उशीरा अकरा वाजता गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमर रहे अमर रहे.. ..प्रविण गायकवाड अमर रहे..भारत माता की जय. .  या घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता. यावेळी औरंगाबाद येथील लष्कराच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. 

गायकवाड यांचे आई, वडील, एक भाऊ आणि दोन बहिणी, नातेवाईक, गावकरी व माजी सैनिक संघ, जिल्ह्यातील राजकीय नेते,पोलीस प्रशासन, पत्रकार, परिसरातील नागरिकांनी साश्रू नयनांनी श्रदधांजली वाहुन अखेरचा निरोप दिला. मुळचे मालेवाडी ता. गंगाखेडचे असलेले शिवाजी गायकवाड पिंपळदरी येथे स्थायिक झालेले असुन रक्षाबंधनासाठी घेतलेली महिनाभराची सुट्टी संपल्याने रविवारी (ता.26) सकाळी रांची येथे कर्तव्यावर हजर होण्यासाठी जात असताना हिंगोलीच्या दरम्यान रेल्वे अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: jawan pravin gaikwad cremation