पावसामुळे जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले

चंद्रकांत तारु
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

येथील जायकवाडी धरणात नासिक, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे धरणाच्या 27 पैकी एकुण 16 दरवाजे गुरुवारी (ता. 26) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडण्यात आले आहे. या दरवाज्याच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्यात आले आहे. बुधवारी ता. 25 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यामुळे आधीच शंभर टक्के पाणीसाठा असलेल्या धरणाची पातळी पातळीने  शंभर टक्के पातळी ओलांडल्यामुळे धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी धरणातुन पाणी सोडण्याचा तातडीने निर्णय घेतला व रात्री साडेनऊ वाजता दहा दरवाजे एक फुट सहा इंचाने उचलुन पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरु केला.

पैठण - येथील जायकवाडी धरणात नासिक, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे धरणाच्या 27 पैकी एकुण 16 दरवाजे गुरुवारी (ता. 26) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडण्यात आले आहे. या दरवाज्याच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्यात आले आहे. बुधवारी ता. 25 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यामुळे आधीच शंभर टक्के पाणीसाठा असलेल्या धरणाची पातळी पातळीने  शंभर टक्के पातळी ओलांडल्यामुळे धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी धरणातुन पाणी सोडण्याचा तातडीने निर्णय घेतला व रात्री साडेनऊ वाजता दहा दरवाजे एक फुट सहा इंचाने उचलुन पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरु केला. यानंतर आज  गुरुवारी( ता. 26)पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पुन्हा  दरवाजे उघडण्यात आले. सद्यस्थितीत  एक फूट सहा इंचाने दरवाजे क्रमांक 10,16,21,14,23,12,25, 11,13,24,15,22,17,20 यातुन पाणी सुरु आहे. 

धरण व तालुका प्रशासन झाले सतर्क! 
दरम्यान, अचानक मोठा पाऊस झाल्यामुळे नासिक व नगर जिल्ह्यातून वेगाने जायकवाडी धरणात पाणी दाखल येण्यास सुरुवात झाली. यामुळे धरण व तालुका प्रशासनाने सतर्क होवुन पाणी पातळीची विशेष नौंद घेवुन तातडीने गोदापात्रात पाणी सोडले. पाणी वाढत असल्यामुळे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उप अभियंता अशोक चव्हाण, सहायक अभियंता बुध्दभुषण दाभाडे,संदीप राठोड यांनी धरणावर ठाण मांडून विशेष नियंत्रण ठेवले आहे. तालुका प्रशासनात तर्फे तहसीलदार महेश सावंत यांनी गोदाकाठच्या गावांना सोशल मिडिया व महसुल यंत्रणेच्या माध्यमातून संपर्क साधुन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayakwadi Dam 16 Door Open by Rain Water