Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Jayakwadi Dam : धरणाचे नियमित १८ दरवाजे ४ फुटांनी, तर आपत्कालीन ९ दरवाजे दीड फुटांनी असे २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रात एक लाख पंधरा हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Water released from Jayakwadi Dam after heavy rainfall; Godavari river flows at danger mark as emergency gates opened.

Water released from Jayakwadi Dam after heavy rainfall; Godavari river flows at danger mark as emergency gates opened.

esakal

Updated on

Summary

  1. सततच्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १.१५ लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

  2. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  3. पावसाचा जोर वाढल्यामुळे विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

जायकवाडी धरण क्षेत्रात शनिवारी दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आज १५ सप्टेंबर यकवाडी धरणाचे नियमित १८ दरवाजे ४ फुटांनी, तर आपत्कालीन ९ दरवाजे दीड फुटांनी असे २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रात एक लाख पंधरा हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com