

CCTV Captures Daring Theft of Silver Jewellery from Car in Ambad City
esakal
-बाबासाहेब गोंटे
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरात मंगळवारी (ता.12) छत्रपती संभाजीनगर येथील होलसेल सराफा व्यापारी मयूर सुराणा हे आपली कार क्रमांक एम. एच.20 जी. क्यू.2595 मध्ये चांदीचे दागिने व्यापाऱ्यांना देण्यासाठी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आले होते. काही व्यापाऱ्यांना चांदीचे दागिने देऊन रोख रक्कम व चांदीचे दागिने बॅगेत टाकून कारमध्ये ठेवली होती. मात्र त्यांच्या कारचा दरवाजा उघडा असल्याने अज्ञात चोरट्याने संधी साधून सात किलो चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून 15 लाख 42 हजार 300 रुपयावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.