esakal | जिंतूर मतदारसंघ : पूल व रस्त्याच्या कामासाठी ११२ कोटी निधी मंजूर : आमदार बोर्डीकर
sakal

बोलून बातमी शोधा

जिंतूर मतदारसंघ : पूल व रस्त्याच्या कामासाठी ११२ कोटी निधी मंजूर : आमदार बोर्डीकर

मतदार संघामध्ये यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्रथमच मंजूर झाला असावा. त्यामुळे ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची आणि पुलांची कामे बऱ्याच प्रमाणात मार्गी लागतील अशी मतदारसंघातील जनतेला आशा आहे.     

जिंतूर मतदारसंघ : पूल व रस्त्याच्या कामासाठी ११२ कोटी निधी मंजूर : आमदार बोर्डीकर

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी) : जिंतूर विधानसभा मतदारसंघातील जिंतूर व सेलू तालुक्यात पुल आणि रस्ते विकासाच्या कामासाठी तब्बल ११२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली आहे. यामुळे त्यांच्या अनेक दिवसांपासूनच्या प्रयत्नाला यश आले म्हणावे लागेल.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१- २२ मध्ये आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी सभागृहांमध्ये विविध विकास कामांबाबत आवाज उठविला त्याची सकारात्मक दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जिंतूर आणि सेलू तालुक्यातील पूल व रस्त्यांच्या विकासासाठी ११२ कोटी रुपये एवढा घसघशीत निधी मंजुरी देण्याकरिता सहकार्य केले आहे. मतदार संघामध्ये यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्रथमच मंजूर झाला असावा. त्यामुळे ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची आणि पुलांची कामे बऱ्याच प्रमाणात मार्गी लागतील अशी मतदारसंघातील जनतेला आशा आहे.     

याशिवाय आदिवासी विभाग, ग्राम विकास विभागातर्फे २, ५१५ लेखाशिर्ष अंतर्गत विविध विकास कामे, तांडा वस्ती सुधार योजना, सामाजिक न्याय विभागाच्यावतीने दलीत वस्ती सुधार योजना, पाणी पुरवठा योजना, पर्यटन विकास, आरोग्य विभाग आदी विभागांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मंजूर निधीमुळे जिंतूर तालुक्यातील कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या येलदरी धरणासमोर पूर्णेच्या पात्रातील कमी उंचीच्या अरुंद पुलाचे बांधकाम होण्यासाठी गती मिळणार आहे. जिंतूर- येलदरी- फाळेगाव (रामा. २४८) विदर्भाला जोडणारा जवळचा मार्ग असून साठ वर्षापूर्वी पूर्णा प्रकल्प निर्मितीच्यावेळी या पुलाचे बांधकाम करण्यात आले. पावसाळ्यात पुलावरुन पाणी वाहतांना या मार्गावरची वाहतूक दोन- दोन दिवस बंद पडते. अनेक अपघातही घडले आहेत. त्यात वित्त व जिवीत हानीच्या घटना घडल्या. पुलाच्या नवीन बांधकामासाठी ९५ कोटीचा प्रस्ताव सादर आहे.

जिल्हा सरहद ते वडी वाघी प्रजीमा २ घागरा- कावी- दहेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १० कोटी खर्च अपेक्षित आहे.
सेलु तालुक्यातील वाटूर- परतुर- सेलू- कोल्हा- वालूर- चारठाणा या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी पाच कोटी, रामा २५३ ते ढेंगळी पिंपळगाव,  झोडगाव, तिडी पिंपळगा व धामणगाव,  देऊळगाव गात व डासाळा रस्त्याच्या कामाकरिता दोन कोटी खर्च अपेक्षित आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image