जिंतूर-औरंगाबाद महामार्गावर मोटारीचा अपघात; चालक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

देवगावफाटा - जिंतूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीचा (क्रमांक एमएच 7693) देवगावफाटा वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मोटार चालक गंभीर जखमी झाला आहे.

देवगावफाटा - जिंतूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीचा (क्रमांक एमएच 7693) देवगावफाटा वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मोटार चालक गंभीर जखमी झाला आहे.

आज (बुधवार) रात्री आठ वाजता मोटार देवगावफाटा येथील वळण रस्त्यावर आल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या खाली जाऊन पलटली. या अपघातात चालक ध्रुपद दराडे (वय 30, रा. किनेगाव, ता. औंढा, जि. हिंगोली) हा गंभीर जखमी झाला. देवगावफाटा येथील वळण रस्त्यावर वळणाची माहिती देणारा कोणताही सूचना फलक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेला नाही. रात्रीच्या वेळी वाहनधारकांना ही बाब लक्षात येत नाही. त्यामुळे हा वळण रस्ता धोकादायक ठरत आहे. या वळण रस्त्यावर सूचना फलक त्वरित लावण्यात यावे अशी वाहन चालकांकडून मागणी केली जात आहे.

Web Title: jintur new aurangabad news marathi newws maharashtra news accident news