डीएमईआरचे सहसंचालकांची शासकिय रुग्णालयाच्या पाहणीला सुरुवात

योगेश पायघन
शुक्रवार, 25 मे 2018

औरंगाबाद - वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे मेडिकल विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी (ता 25) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाहणीला सुरुवात केली.  सकाळी साडे दहा वाजता घाटी आलेल्या डॉ लहाने यांनी बाह्यरुग्ण विभागापासून पाहणीला सुरुवात केली.

डॉ. लहाने पाहणीसाठी येणार असल्याने घाटी प्रशासन सकाळपासून दक्ष होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. यू. झिने, डॉ मंगला बोरकर, उप अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. राहूल पांढरे, डॉ विकास राठोड, डॉ अनिल पुंगळे, नारायण कानकाटे, उल्हास पाटील यांची उपस्थित होती. प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ असलेल्या डॉ लहाने यांनी नेत्ररूग्ण विभागात सर्वप्रथम भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर मेडिसिन, अस्थीव्यंगोपचार, वार्धक्यशास्त्र, सर्जरी, मनोविकार, स्त्रीरोग विभागाच्या ओपीडीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सर्जिकल इमारतीकडे मोर्चा वळवला. तीन वाजता कॉलेज कौन्सिलच्या बैठक घेणार असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. 

सहसंचालकाच्या पहाणीनंतर घाटीच्या समस्या मार्गी लागतील अशी आशा असल्याने त्यांच्या या पाहणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joint Director of DMER, started the survey of the hospital