
कन्नड : गणेश उत्सव व ईद ए मिलाद या दोन सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील चिकलठाण, चापानेर, हतनुर, या तीन मोठ्या बाजारपेठेच्या गावात सोमवारी (ता.१) ला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले.